Press "Enter" to skip to content

कळंबोली येथे शिक्षण महर्षी दादासाहेब लिमये जयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धा

सिटी बेल | पाणदिवे | मनोज पाटील‌ |

सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पाली चे माजी अध्यक्ष स्वर्गीय शि़क्षण महर्षी दादासाहेब लिमये यांच्या जयंती निमित्त कोकण विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

वत्कृत्व स्पर्धेसीठी खालील विषय ठेवण्यात आले आहेत.शिक्षण – ऑनलाईन की ऑफलाईन ,बदलते निसर्ग चक्र ,कोरोना आणि सामाजिक अर्थव्यवस्था ,कर्मयोगी शिक्षणमहर्षी स्व.दादासाहेब लिमये ,आपत्ती व्यवस्थापन एक सामाजिक जबाबदारी या एका विषयावर स्पर्धकांनी ४+१ मिनिटे आपला विषय मांडावयाचा आहे .प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालयाचे दोन स्पर्धक पाठवायचे आहे.स्पर्धकाला ओळखपत्राशिवाय प्रवेश दिला जाणार नाही.स्पर्धेचे माध्यम मराठी,हिंदी किंवा इंग्रजी राहील .प्रवेशिका स्पिकारण्याची अंतिम तारीख २७ नोव्हेबर २०२१ राहील.या स्पर्धेचे प्रवेश शुल्क १०० रूपये आहे.

सदर स्पर्धा ही मंगळवार दिनांक ३० नोव्हेबर २०२१ रोजी सु.ए.सो.चे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली ,ता. पनवेल ,जि.रायगड येथे सकाळी ९ वाजता होणार आहे.प्रथम क्रमांक ३००१ सन्मानचिन्ह व सन्मानपत्र ,द्वितीय क्रमांक २००१ सन्मानचिन्ह व सन्मानपत्र व तृतीय क्रमांक १००१ सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे .अधिक माहिती व प्रवेशिकेसाठी सौ. के.व्ही. काशिद ९९६९१८०१४५, श्री. एल.के. जोशी ९८६७०२१०४४ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन प्राचार्य राजेद्र पालवे यांनी केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.