सिटी बेल लाइव्ह / पाणदिवे (मनोज पाटील)
सुधागड एज्युकेशन सोसायटी च्या कळंबोली येथील माध्यमिक शाळेचा मार्च मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा मराठी विभागाचा निकाल ९६.५१ टक्के ,हिंदी विभागाचा निकाल ९४.०३ टक्के तर इंग्रजी विभागाचा निकाल ९८.६४ टक्के लागला आहे.
या मध्ये मराठी विभागात प्रथम क्रमांक शुभम राजेंद्र जगताप ९४.२०टक्के ,द्वितीय क्रमांक श्रेया बापुसाहेब ढवले ९३.६०टक्के ,प्राजक्ता आण्णा गायकवाड ९३.६०टक्के तर तृतीय क्रमांक अदिती राजेंद्र सस्ते ९३.२०टक्के .हिंदी विभागात प्रथम क्रमांक लक्ष्मी संतोष गुप्ता ९०.८०टक्के ,द्वितीय क्रमांक दिक्षा ईश्वर पटेल ९०.६० टक्के तर तृतीय क्रमांक रितीक राधेश्याम विश्वकर्मा९०.२० टक्के .इंग्रजी विभागात प्रथम क्रमांक सत्यम मौर्या९२.००टक्के , द्वितीय क्रमांक विवेक प्रसाद ९०.६०टक्के तर तृतीय क्रमांक रूपेश यादव ९०.२० टक्के गुण मिळाले आहेत.
यशस्वी विद्याथ्यांचे सु.ए.सो.पालीचे अध्यक्ष वसंतराव ओसवाल ,सचिव रविकांत घोसाळकर ,प्राचार्य राजेंद्र पालवे ,उपमुख्याध्यापिका सरोज पाटील ,कार्यालयीन अधीक्षक दत्ता शिंदे ,इंग्रजी विभागाच्या प्रमुख कल्पना कुळकर्णी ,सर्व विभागाचे पर्यवेक्षक ,शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थीचे अभिनंदन केले आहे .






Be First to Comment