Press "Enter" to skip to content

फुस लावून युवतीला नेलं पळवून

सिटी बेल | पनवेल | वार्ताहर |

कळंबोली वसाहतीमधील सिडको पाली फिल्टर प्लांट रोडपाली तलावाजवळून एका अल्पवयिन युवतीला फुस लावून पळवून नेल्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी तिच्या नातेवाईकांनी कळंबोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.           

कु. अश्विनी ढाळे असे या मुलीचे नाव असून रंग गोरा, उंची 5 फूट, अंगाने सडपातळ, केस तांबूस, डोळे काळे, नाक सरळ, चेहरा उभट आहे. तिच्या अंगात पोपटी रंगाचा कुर्ता व सफेद पायजमा, नाकात सोन्याची वस्तू व पायात सॅंडल आहे. या युवतीबाबत कोणाला अधिक माहीती असल्यास कळंबोली पोलिस ठाणे किंवा पोलिस उपनिरीक्षक एन.बी. बच्चाव यांच्याशी संपर्क साधावा. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.