सिटी बेल लाइव्ह / गोवे-कोलाड (विश्वास निकम )
मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या सु.ए.सो.पालीचे कै.द.ग.तटकरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा एस.एस.सी.चा निकाल ९५%लागला असुन या विद्यालयाची उज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे.
मार्च २०२०मध्ये घेण्यात आलेल्या कै.द.ग.तटकरे कोलाड या विद्यालयाचा एस.एस.सी.चा निकाल ९५%लागला असुन या विद्यालयातुन कु.सेजल उमेश बिरगावले ९१.२०%गुण संपादित करुन प्रथम,कु.समृद्धी समीर सानप ९०.८०%गुण संपादित करून द्वितीय,कु.यश राजेश साळी ९०.२०%गुण संपादित करून तृतीय,कु.श्रावणी संतोष खांडेकर ८८.६०%गुण संपादित करुन चतुर्थ,कु.जान्हवी दिपक मोरे ८७.२०%गुण संपादित करुन पाचवी आली. सुधागड एजुकेशन सोसायटीचे अध्यक्ष वसंतराव ओसवाल,कार्यध्यक्ष सौ.गीता पालरेचा, सचिव रविकांत घोसाळकर,यांनी विद्यालयाच्या यशा बद्दल प्राचार्य शिरीष येरुणकर,उपप्राचार्य सुखदेव तिरमळे,मोहनराव थोरबोले,दादासाहेब हाटे,वसंत थोरात,अस्मिता महाबळे,रेणुका धनावडे,हनुमंतराव काळे,भगवान काळे,उदय घोसाळकर,अविनाश माळी डी.आर.पाटील यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे तसेच आंबेवाडी ग्रामपंचायत सरपंच व स्कुल कमेटी अध्यक्ष सुरेश महाबळे यांनी ही उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले.






Be First to Comment