माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांची मागणी
सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू)
जेएनपीटी बंदराला निगडीत असणारे सीएफएस मधील कर्मचारी, पोलीस कर्मचारी, उरण तालुक्यातील महसूल कर्मचारी त्याचबरोबर कंत्राटमध्ये काम करणारे कंत्राटी कर्मचारी जेएनपीटी वसाहतीमध्ये भाड्याने राहत आहेत. सध्या कोरोनाची साथ चालू असताना अनेक कंत्राटी कर्मचाऱ्यांना पूर्ण पगार मिळत नसल्यामुळे त्यांना अनेक प्रसंगाना सामोरे जावे लागत आहे.
जेएनपीटी वसाहत खात्याकडून इमारतीचे भरमसाठ भाडे वाढ केल्याचे समजताच, माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी तात्काळ जेएनपीटी चे सह-चेअरमन(उपाध्यक्ष) श्री.उन्मेश वाघ यांची भेट घेऊन कोव्हीड 19 या महामारीचा प्रादुर्भाव संपेपर्यंत डिसेंबर २०२० पर्यंत सदर वसाहतीमध्ये कोणतीही भाडेवाढ करू नये, ज्यामुळे वास्तव्य करणाऱ्या रहिवाशांना आहेत त्यांच्यावर कोणतीही आर्थिक संकट निर्माण होणार नाही अशी मागणी केली. यावरविचारपूर्वक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.






Be First to Comment