Press "Enter" to skip to content

कळंबोली येथील तरूणी बेपत्ता

सिटी बेल | पनवेल | वार्ताहर |

राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता एक तरूणी कुठेतरी निघून गेल्याने ती हरविल्याची तक्रार कळंबोली पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

कु. भारती साहू (रा.-कळंबोली गाव) असे या मुलीचे नाव असून वर्ण गोरा, उंची 4 फूट 5 इंच, अंगाने सडपातळ, चेहरा गोल, केस काळे, पाठी पर्यंत लांब, कपाळावर फोडींच्या निशाणी, दोन्ही हातांवर जुने काळे डाग आहेत. अंगात ब्राऊन रंगाचा टॉप व प्लाजो घातला आहे. तसेच कानात बाली घातली आहे. या तरूणीबाबत कोणाला अधिक माहीती असल्यास कळंबोली पोलिस ठाणे किंवा सहा. पोलिस निरीक्षक नितीन कुंभार यांच्याशी संपर्क साधावा.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.