सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |
उरण पनवेल महामार्गावर गव्हाण फाटा येथील पुलावरून ट्रेलर कंटेनरसह रेल्वे रुळावर कोसळून झालेल्या अपघातात चालक जागीच ठार झाला. या अपघातामुळे ९ तास रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. त्याचा परिणाम जेएनपीटीच्या आयात निर्यातीवर होऊन कोट्यवधीचे आर्थिक नुकसान झाले आहे.
उरण पनवेल महामार्गावरून ट्रेलर कंटेनर घेऊन जात असताना गव्हाण फाटा नजीक पुलावरून थेट रेल्वे रुळावर कोसळला. ओव्हर हेड वायर तुटल्याने रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. याचा जेएनपीटीच्या आयात निर्यातीवर होईन कोट्यवधींचे आर्थिक नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या अपघातात ट्रेलर चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

उरण परिसरात मोठ्या प्रमाणात उड्डाण पूलाची उभारणी करण्यास सुरुवात केली आहे.परंतु याकडे शासकीय व्यवस्थापनाचे आर्थिक साटेलोटामुळे पूर्णपणे डोळेझाक सुरू आहे. काही दिवसांपूर्वी जासईजवळ उड्डाणपुलाचा भाग कोसळून भीषण अपघात होऊन कामगारांचा बळी गेला. मात्र हे प्रकरण दडपण्यात आल्याचे समजते. नव्याने वाहतूकीसाठी सुरु करण्यात आलेल्या उड्डाण पूलावरुन रात्री ९:३० च्या सुमारास मालाची वाहतूक करणारा कंटेनर टेलर पलटी होण्याची दुदैवी घटना घडली.








Be First to Comment