Press "Enter" to skip to content

चॉपर ने वार करणाऱ्यास कर्जत पोलिसांनी केली अटक

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

कर्जत पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 11 नोव्हेंबर 2021 रोजी रोजी रात्री 7:30 वा.सुमारास मौजे फातीमानगर भिसेगाव येथे फिर्यादी रा.फातीमानगर भिसेगाव ता.कर्जत हे मच्छी मार्केट मधुन भाजी घेवून घरी येत असताना रेल्वेस्टेशनजवळ फिर्यादीच्या बहीनीचा नवरा यातील आरोपी रा. फातीमानगर भिसेगाव ता.कर्जत हा फिर्यादीच्या मांजरीचे पिल्लू घेवून दिसला तेव्हा फिर्यादी त्यास म्हणाले माझे मांजरीचे पिल्लू घेवून कोठे चालला आहेस माझे मांजरीचे पिल्लू मला दे असे बोलले असता तेव्हा तो पळून जात असताना फिर्यादी त्याच्या पाठीमागे मांजरीचे पिल्लू घेण्यासाठी जात असताना तो फातीमानगर भिसेगाव येथील चर्च जवळ गायब झाला तेव्हा फिर्यादी तेथून घरी परत जाण्यासाठी निघाले असताना यांतील आरोपी हा अचानक फिर्यादीचे पाठीमागे येवून त्याने त्याच्या हातातील चॉपरने फिर्यादीच्या डाव्या बाजुच्या कुशीवर व कमरेवर मारून गंभीर स्वरुपाची दुखापत केली. सदर गुन्ह्यातील आरोपीस दिनांक 18 नोव्हेंबर 2021 रोजी अटक करण्यात आली आहे.

याबाबत कर्जत पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 292/2021 भा.दं.वि.क. 326 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीपान सोनवणे हे करीत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.