अश्लील व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देत मोहपाडा येथील महिलेवर अत्याचार
सिटी बेल | खालापूर | प्रतिनीधी |
अश्लील व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देत मोहपाडा येथील महिलेवर अत्याचार करण्याची घटना घडली असून सावळे गावातील आरोपी विरोधात रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिला ही एम.एस.ई बी.कॉलनी मोहोपाडा इथे राहणारी आहे. सावळे गावात राहणारा आरोपी यांनी पीडित महिलेचे अश्लील व्हीडीओ व्हायरल करेल अशी वारंवार धमकी देवून वारंवार जबरदस्तीने मनाविरुघ्द शारिरीक संबध केले. तिला गुळसुंदे येथील घरामध्ये पंधरा दिवस कोंडून ठेवले. महिलेनी स्वतःची सुटका करत रसायनी पोलीस ठाणे येथे तक्रार दिली आहे.
पोलीसांनी भा.दं.वि.कलम.376, 363, 341,506,34 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सपोनी एम.बालवडकर हे करीत आहे.








Be First to Comment