कोकण एज्युकेशन सोसायटीचे संचालक व माजी आमदार पंडितशेठ पाटील यांच्याकडून विद्यालयातील मुख्याध्यापक व सेवकांचे कौतुक
सिटी बेल लाइव्ह / रोहा/समीर बामुगडे #
कोकण एज्युकेशन सोसायटी मेहेंदळे हायस्कूल दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल 98.35% इतका लागला असून हा आज पर्यंतच्या इतिहासातील सर्वात जास्त निकाल आहे. यामध्ये 243 पैकी 239 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यामध्ये डिस्टिंक्शन मध्ये 63 व प्रथम श्रेणीत 94 विद्यार्थी आहेत.
कुमारी पोळेकर अस्मि किशोर हिने 98 .20 टक्के मार्क मिळून प्रथम क्रमांक मिळवला आहे . द्वितीय क्रमांक महाडिक वेदांत सुनील याला 97. 40 तर कुमारी सेजल दिलीप सिंग गिरासे हिला 97% मार्क मिळून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेली आहे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे चेअरमन संदीप जी गांगल, संचालक अॅड. हेमंत गांगल सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मुख्याध्यापक तथा प्राचार्य मोसे सर यांच्याकडून हार्दिक अभिनंदन करण्यात आले.






Be First to Comment