बीएसएनएल कर्जत कार्यालयात चोरी
सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
कर्जत पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 13 नोव्हेंबर ते दि.15 नोव्हेंबर 2021 रोजी 18:15 वा च्या दरम्यान कर्जत येथील बीएसएनएल कार्यालयाचे दुरध्वनी केंद्र विभाग येथे कोणीतरी अज्ञात इसमाने बीएसएनएल दूरध्वनी केंद्र कर्जत विभाग कार्यालयाचे बाहेरील गेटचे व ऑफिसचे मुख्य दरवाज्याचे, स्टोअर रुमचे दरवाज्याला लावलेले कुलूप तोडुन त्यावाटे आत प्रवेश करुन कोणीतरी अज्ञात चोरटयांनी 55, हजार 688 रुपये किंमतीची दोन एसी स्व:ताच्या फायदया करीता घरफोडी चोरी करून नेले.
याबाबत कर्जत पोलीस ठाणे येथे गु.र.नं.290/2021 भा.दं.वि.क 454,457,380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस हवालदार सानप हे करीत आहे.








Be First to Comment