माजी आमदार मनोहर भोईर यांची जेएनपीटीकडे मागणी
सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू)
जेएनपीटी बंदराच्या उभारणीसाठी विस्थापित करण्यात आलेल्या नवीन शेवा व हनुमान कोळीवाडा या गावांना प्रॉपर्टी टॅक्स मिळावा अशी मागणी माजी आमदार मनोहर भोईर यांनी जेएनपीटीकडे केली आहे.
नवीन शेवा व हनुमान कोळीवाडा हि गावे जेएनपीटी प्रकल्पासाठी पुनर्वसित झालेली असून, हि दोन्ही गावे मिळून मूळ जुने गाव शेवा व शेवा कोळीवाडा असे होते. सध्या अस्तित्वात असलेल्या जेएनपीटी बंदरामधील जेएनपीटी प्रशासन भवन, ट्रेनिंग सेंटर, गेस्टहाऊस, पंप हाउस या सर्व इमारती या जुना शेवा गावाच्या हद्दीमध्ये जेएनपीटी बंदर आल्यानंतर बांधकाम केलेल्या आहेत.
जेएनपीटी बंदरासाठी या दोन्ही गावांना विस्थापित केले असून. गावांच्या विकासासाठी उत्पनाचे इतर कोणतेही साधन नाही. पाणीपट्टी, वीजबिल, नालेसफाई व मोकळ्या जागेतील साफसफाई करण्यासाठी ग्रामपंचायतकडे एकही रुपया उत्पनाचा येत नाही.तरी या दोन्ही ग्रामपंचायतींना याआधी दिलेल्या प्रॉपट्री टॅक्स प्रमाणे आताही प्रॉपट्री टॅक्स देण्यात यावा अशी मागणी माजी आमदार मनोहर भोईर यांनी जेएनपीटी चेअरमन(अध्यक्ष), सह-चेअरमन(उपाध्यक्ष), मा.चिफ मॅनेजर, जेएनपीटी, यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.






Be First to Comment