Press "Enter" to skip to content

बेकायदेशीररित्या वाळू उपसा

खारघर खाडीमध्ये वाळू उपसा करणार्‍यांवर धडक कारवाई ; दोन बोटी आणि वाळू हौद केले नष्ट

सिटी बेल | पनवेल | वार्ताहर |

पनवेल तालुक्यातील खारघर खाडी भागात अनधिकृतपणे वाळू उपसा होत असल्याची खबर मिळताच जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव आणि पनवेल उपविभागीय अधिकारी, राहुल मुंडके यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तहसिलदार विजय तळेकर यांच्यासह मंडळ अधिकारी सुनील पाटील व इतर कर्मचार्‍यांनी अनधिकृत गौण खनिज उत्खनन करणार्‍यांवर  धडक कारवाई केली.

या कारवाईत या पथकाने दोन बोटी व वाळूचे हौद नष्ट केले. संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती पनवेल तहसिलदार विजय तळेकर यांनी दिली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.