Press "Enter" to skip to content

खारघरमध्ये खळबळजनक घटना

11 वर्षीय मुलीवर चुलत्याने केले लैंगिक अत्याचार : नराधमाला घातल्या बेड्या

सिटी बेल | पनवेल | वार्ताहर |

खारघर मध्ये एका 11 वर्षीय मुलीवर 34 वर्षीय चुलत्याने लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकरण उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे. या घटनेतील आरोपीचे नाव फरीद खलील शेख असे आहे. सदर आरोपी तडीफार असताना त्याने सदर गुन्हा केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

खारघर पोलिसांनी फरीद खलील शेख याला अटक केली आहे. खारघर शहर सुनियोजित आणि सुशिक्षित शहर म्हणून ओळखले जाते. परंतु, खारघर ओवे परिसरातील एका गावात मुलीच्या चुलत्याने लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकरण उघडकीस आल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.

एकाच इमारती मध्ये पीडित मुलीचे कुटुंब आणि तिचा चुलता वास्तव्यास असून, पीडित मुलीचे वडील एका गुन्ह्यात दोषी आढळून आल्यामुळे कारागृहात शिक्षा भोगत आहेत. आई कामात व्यस्त असल्याची संधी साधून आरोपी फरीद खलील शेख याने सदर मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे तपासात उघड आल्यामुळे सदर आरोपीस खारघर पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास खारघर पोलीस करीत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.