रोहा येथील क्रीडा संकुलाचे नूतनीकरण : पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते उद्धघाटन
८० कोटी निधीची मंजुरी : माणगाव येथे सुरु होत आहे कोकण विभागीय क्रिडा संकुल
सिटी बेल | धाटाव रोहा | शशिकांत मोरे |
रोहा तालुक्यात क्रीडा संकुल उभारणीच्या ब-याच कालावधीनंतर संकुलाची दुरुस्ती करणे फार गरजेचे होती.त्यानुसार निधी उपलब्ध करुन रोहा तालुका क्रीडा संकुलाची दुरुस्ती करण्यात आली.खेलो इंडिया, ऑलम्पिक स्पर्धांमध्ये आपल्या जिल्ह्यातील खेळाडू सहभागी होतील हा भविष्याच्या दुष्टीकोनातून प्रयत्न करणार आहोत.आता रोहा क्रीडा संकुलात विविध खेळांचे प्रशिक्षण देण्यासाठी क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांना आवाहन केले.८० कोटी निधीची मंजुरी असलेले कोकण विभागीय क्रिडा संकुल माणगाव येथे सुरु होत आहे.त्या माध्यमातून कोकणातील खेळाडूंना चालना मिळणार असल्याने खेलो इंडिया संकल्पनेतुन रायगडच्या क्रिडा विश्वात चैतन्य निर्माण करणार असल्याचे प्रतिपादन रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी केले.
क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे,जिल्हा क्रीडा अधिकारी रायगड,तालुका क्रीडा अधिकारी रोहा आयोजित क्रीडा संकुल रोहा नूतनीकरण उद्धघाटन पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी त्या बोलत होत्या.कार्यक्रमासाठी कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार अनिकेत तटकरे,जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक,राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस विजयराव मोरे,जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर पाटील,तालुकाध्यक्ष विनोदभाऊ पाशिलकर, युवक अध्यक्ष जयवंत मुंढे,शंकर भगत,प्रदीप देशमुख,अनंत देशमुख,सतिश भगत,डाॕ.अशोक जाधव,संतोष भोईर सरपंच सुवर्णा रटाटे,यशवंत रटाटे,युवती अध्यक्षा रविना मालुसरे,महेंद्र गुजर,मयुर दिवेकर,लगोरीपटू श्री.गुरव,तालुका क्रिडा अधिकारी,तहसिलदार कविता जाधव,क्रीडा अधिकारी अंकीता मयेकर,क्रीडा अधिकारी सचिन निकम,राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते,धाटाव ग्रामस्थ व क्रिडाप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान कार्यक्रमात कोकण स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषदेचे आमदार अनिकेत तटकरे यांनी संबोधित करताना खा.सुनिल तटकरे यांनी गेल्या विस वर्षात राज्य व राष्ट्रिय स्तरावरील स्पर्धा रोहा तालुक्यात घेतल्या.आणी कबड्डी,खोखो, क्रिकेट, कुस्ती, बॉडीबिल्डींग स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे रायगड जिल्ह्यातील खेळाडुंचे प्रमाण वाढले असल्याची आठवण करून दिली तर क्रीडा संकुलात लवकरच व्यायामशाळा देणार असल्याचे सांगितले.तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद पवार साहेब यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्ताने ८१ खेळाचे आयोजन रायगड जिल्ह्यात घेणार आहोत असे सांगितले.
ग्रामीण भागांतील खेळांडूना प्रोत्साहन मिळावे व दर्जेदार खेळाडू घडावे यासाठी महाराष्ट्र शासनाने जिल्हा व तालुका स्तरावर क्रीडा संकुलाची निर्मिती केली.विविध क्रिडा प्रकारांचा सराव करुन खेळाडूंची एक पिढी उभे करण्याचे काम क्रिडा संकुल करित आहेत. मागील वर्षी निसर्ग चक्रीवादळाच्या प्रकोपाचा फटका रोहा तालुका क्रिडा संकुलाला मोठ्या प्रमाणात बसला.क्रिडा संकुलाचे छप्पर उडाले तर प्लॕस्टर व आतील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
दरम्यान कार्यक्रमात क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी उपस्थित मान्यवरांचे सन्मान केले.तसेच दर्जेदार काम करणाऱ्या मेसर्स सुरज कंस्ट्रक्शनचे संचालक तथा रोहा तालुका बॕडमिंटन असोशिएशनचे अध्यक्ष संतोष भोईर यांचे कौतुक करण्यात आले.








Be First to Comment