सिटी बेल लाइव्ह / विठ्ठल ममताबादे / उरण #
मार्च 2020 रोजी घेण्यात आलेल्या एस. एस.सी. परीक्षेचा द्रोणागिरी हायस्कूल इंग्रजी माध्यमाचा निकाल 100 % लागला आहे.हे विद्यालय ग्रामीण भागात असुनही या विद्यालयाने 100 % निकालाची परंपरा कायम राखली आहे.
विद्यालयातील इंग्रजी माध्यमातून अनुक्रमे कु. साध्वी कोळी 94. 20 % मार्क्स मिळवून प्रथम , कु दिशा पाटील 93. 20%मार्क्स मिळवून द्वितीय व कु. हर्ष कोळी 93. 00 % मार्क्स मिळवून तृतीय येण्याचा मान मिळवला आहे . तसेच कु. प्रियेश म्हात्रे 92.40 % , कु. श्रेया पाटील 91. 80 % , कु. भुमिषा कोळी 90. 20 % मार्क्स मिळवून अनुक्रमे चौथा, पाचवा व सहाव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.
या त्यांच्या उत्तुंग यशाबद्दल करंजा मच्छीमार सोसायटीचे चेअरमन श्री . भालचंद्र कोळी साहेब व सर्व सदस्य त्याप्रमाणे विद्यालयाच्या चेअरमन सौ. गीता भगत मॅडम यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी , शिक्षकवृंद यांचे अभिनंदन केले. तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. प्रभू मॅडम व इतर सहकारी शिक्षकांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
या विद्यार्थ्यांच्या यशामागे मुख्याध्यापिका सौ. प्रभु मॅडम यांचे बहुमोल मार्गदर्शन व इतर शिक्षकांचे अथक परिश्रम ,विद्यार्थ्यांनी घेतलेली मेहनत आणि त्यांच्या पालकांचे सहकार्य तसेच करंजा मच्छीमार सोसायटीकडून मिळालेली वेळोवेळी शैक्षणिक मदत आणि सहकार्य महत्वाचे आहे.
विद्यालयाच्या या उत्तुंग यशाबद्दल सर्वत्रच अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.






Be First to Comment