रोह्यात कोरोना रुग्णांनी 500 चा टप्पा ओलांडला
सिटी बेल लाइव्ह / रोहा (शरद जाधव)
रोहा तालुक्यात कोरोना रुग्णाची झपाट्याने वाढ झाली आहे जवलपास 500 चा टप्पा रुग्नानी ओलांडला आहे 28 तारीख रोजी एकुण 18 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे रोजच्या या आकड्या चा खेळ थांबणार कधी या विव्ंचनेत नागरिक आहेत. सर्वत्र भितिचे वातवरण पसरले आहे.
चीन चा हा व्हायरस मुंबई मधे आला खरा पण बघता बघता रोह्यात कधी पोचला हे कळले देखील नाही. कुणाला वाटले देखील नाही की कोरोना आजार एवढ्या प्रमाणात वाढेल. आज जवळपास 500 च्या पुढे रूग्ण संख्या झाली आहे. रोजच पॉझिटीव वाढत आहेत. पावसाळा सुरु आहे या काळात ताप सर्दी खोकला नित्यचाच. परंतू ही सर्व लक्षणे ही कोरोना आजारा ची देखील आहेत. त्यामुळे कोरोना समज गैरसमज बाबत सर्व गोंधळ उडाला आहे. रोह्यात वाढणारा आकडा चिंताजनक आहे. शासकीय यंत्रणा कोरोना बाबतीत दक्ष रहिली आहेत. मुंबई सारख्या ठिकाणी पेशंट नेणे परवडणारे नाही. त्यामुळे रोह्यातचं कोविड सेंटर चे जाळे उभे करण्यात आले आहे. त्यामुळे रुग्णांना याच ठिकाणी उपचार मिळत आहेत. काल 18 रूग्ण सापडले. रोजच हा आकड्यचा खेळ चालू आहे. त्यामुळे लोकांच्या मनात भिती निर्माण झाली आहे. कोरोना झाला तरी बरा होऊ शकतो ही मानसिकता प्रत्येकाने ठेवली पाहिजे. परंतू एखादा व्यक्ती आजारी पडला तर पॉझिटिव्ह रिपोर्ट येईल म्हणूण दवाखाण्यातच पोहचत नाहीत. ग्रामीण भागात या आजारा बाबत खूप गैर्समज निर्माण झाले आहेत. कोरोना आजारा व्यतिरिक्त देखील लोक आज मरत आहेत.
किल्यात हद्य विकाराने 32 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला तर धाटाव विभागात तर एक धड धाकट मुलगा चालता बोलता मरण पावला. अतिशय दुखद घटना झाली. कोरोना काळाच्या जखमा आयुष्यात कधीही भरुन निघणार नाहीत. मृत्यू च्या शेवटच्या क्षणी सुध्दा नातेवाईकांची भेट होत नाही. अगदी बेवारस प्रमाणेच म्हटले तरी चालेल अशी अंत्यविधी होत आहे. कोरोना ला आळा बसावा म्हणूण योजलेली लॉकडाऊन योजना फेल गेली आहे. त्याचा उपाय होत नाही रूग्ण वाढतायतच. त्यामुळे हा आजार बरा होतो कुणीही आजार लपवु नका, बोलताना सुरक्षित अंतर ठेवा, मास्क लावा आरोग्याची काळजी घ्या. पावसाळा आहे आहार जपा, लक्षणे जाणवली तर सरकारी दवाखान्यात जा. विणाकारण घराबाहेर पडू नका. सुरक्षित रहा हाच कोरोना ला हरवण्यासाठी चा मार्ग आहे. शासकीय यत्रणेला सहकार्य करा. लोकप्रतिनिधी सुध्दा उपाययोजना आखताना दिसत आहेत. त्यामुळे कोरोना कधी जाईल हे माहित नाही. मात्र त्याला हरवण्यासाठी सज्ज रहा ! मला कोरोना होणारच नाही हे मनोबल ठेऊन कोरोनाला हरवा !






Be First to Comment