रसायनी परीसरातील तुराडे आणि मोहोपाड्यातुन सतरा वर्षांच्या दोन अल्पवयीन मुली बेपत्ता : नागरिकांमध्ये घबराट
सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
रसायनी परीसरातील तुराडे आणि मोहोपाड्यातुन दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याने येथील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
एका घटनेत मोहोपाडा येथील अजित सावंत यांच्या चाळीत राहणारी कु.कांतीकुमारी विजय कहार वय 17 वर्षे,1 महिना हि बेपत्ता असून याबाबत विजय बबन कहार (वय ५३ वर्षे )यांनी रसायनी पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. बेपत्ता कु.कांतीकुमारी विजय कहार वय १७ वर्षे १ महीने , उंची ४ फुट ५ इंच , चेहारा गोल , डोळे काळे , हातात हिरव्या रंगाने गोरी , उंची – १५५ सेमी अंदाजे , अंगाने सडपाताळ , नेसुस – लाल रंगाचा पंजाबी ड्रेस , केस काळे , चेहरा – उभा अशा वर्णनाची राहत्या घरातून 29 सप्टेंबर रोजी निघून गेली असून ती बेपत्ता झाल्याची खबर पोलिसांना दिनांक 5-11-21 रोजी केली आहे.कांतीकुमारी विजय कहार हिच्या अज्ञानपनाचा फायदा घेवुन कोणीतरी अज्ञात इसमाने तिला फुस लावुन कोठेतरी पळवून नेले असून याबाबत रसायनी पोलीस ठाणे येथे गुन्हा भादवि कलम 363 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ बालवडकर अधिक तपास करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तुराडे येथून सतरा वर्षे तीन महिने वयातील खुशी धर्मेंद्रप्रसाद पांडे हि घरातून बेपत्ता झाल्याची खबर तिचे वडील धर्मेंद्रप्रसाद चंद्रशेखर पांडे,मु.तुराडे,मुळचा बैरगाघ,ता-अमेठी, उत्तरप्रदेश यांनी रसायनी पोलिस ठाण्यात दिली आहे.अल्पवयीन मुलगी खुशी धर्मेंद्रप्रसाद पांडे हिच्या अज्ञातपनाचा फायदा घेऊन तिला 23/10/2021 रोजी कोणीतरी अज्ञात इसमाने तिला फूस लावून कोठेतरी पळवून नेले असून खुशीची उंची चार फुट पाच इंच आहे,तिचा चेहरा गोळ,डोळे काळे, हातात हिरव्या रंगाचे कडे, अंगात काळ्या रंगाचा टाॅप, निळ्या रंगाची जिन्स पॅट,पायात चप्पल अशा वर्णन आहे.याबाबत रसायनी पोलिस ठाण्यात 154/2021 भादंवि.कलम 363 अन्वये गुन्हा दाखल झाला असून याबाबत सहाय्यक पोलिस निरीक्षक गोरक्षनाथ बालवडकर अधिक तपास करीत आहेत.अशा वर्णंनाची मुलगी कोणास आढळल्यास रसायनी पोलिस ठाणे फोन-02192-250133 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन रसायनी पोलिस ठाण्याच्यावतीने करण्यात आले आहे.








Be First to Comment