तोच चंद्रमा नभात
तोच दिवस तीच रात,
गुंफले हातात हात,
मंद सुवासिक वात,
चांदण्यांची बरसात,
माळला गजरा केसात
सलज्ज स्मित ओठात
लाल गुलाबी गालात
तीच आर्तता नयनात
जवळी बस तू निवांत
परिसर बघ असे शांत
तू मी आणि हा एकांत
न राहिली कशाची भ्रांत
सांगू का तुझ्या कानात
आहे जे माझ्या मनात
बघ धडधडत्या उरात
तुझ्याही उष्ण श्वासात
बांधलो तुझ्या वचनात
वाहू दे स्वतःला प्रेमात
वर बघ आकाशात
तोच चंद्रमा पुन्हा नभात
- शेखर अंबेकर, आदई






Be First to Comment