Press "Enter" to skip to content

कला शिक्षकांची जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न

तृप्ती भोईर : उरण

महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ संलग्न, रायगड जिल्हा कलाध्यापक संघ व शिक्षण विभाग माध्यमिक रायगड जिल्हा परिषद अलिबाग, यांच्या संयुक्त विद्यमाने कला शिक्षकांची जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा शुक्रवार दिनांक ५ डिसेंबर २०२५ रोजी पेण रायगड जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय, पतसंस्था पेण येथील सभागृहात सुंदर रित्या संपन्न झाली.

जिल्हास्तरीय कला शिक्षकांच्या कार्यशाळा या कला शिक्षकांना नवीन तंत्रज्ञान, अभ्यासक्रमातील बदल, सर्जनशीलता आणि विविध कला प्रकारांचे प्रशिक्षण देण्यासाठी आयोजित केल्या जातात. ज्यामुळे त्यांना विद्यार्थ्यांमध्ये कला आणि संस्कृती रुजवण्यासाठी मदत होते. यातून शिक्षकांना अनुभव व कौशल्यही मिळते.

नवीन कला तंत्रज्ञानामध्ये चित्रकला ,शिल्पकला, हस्तकला आणि डिजिटल आर्ट मधील नवीन तंत्रज्ञान शिकणे, कला शिक्षणाला मुख्य प्रवाहातील शिक्षणाची जोडणे ,शिक्षकांची सर्जनशीलता वाढवून ते विद्यार्थ्यांना अधिक प्रभावीपणे अशा प्रशिक्षणाद्वारे शिकवू शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती आणि कलेची ओळख निर्माण करून देता येते .

या कार्यशाळेत कलाविषयक नवीन शैक्षणिक धोरण इम्तियाज शेख ,स्मरणचित्र: प्रमोद दीक्षित ,फलक लेखन: आदेश सुतार ,स्थिरचित्र: अजित शेख ,संगीत सादरीकरण: अक्षय साळुंखे इत्यादी नामवंत कलाकारांची यावेळी प्रात्यक्षिके दाखवण्यात आली.

जिल्ह्याचे अध्यक्ष अविनाश कदम, उपाध्यक्ष रमेश खुटारकर ,संदीप पारंगे, सचिव आदेश सुतार, कोषाध्यक्ष सुभाष जाधव, जिल्हा महिला प्रमुख मनीषा पाटील, स्पर्धा प्रमुख रंगनाथ नेरुळकर ,तालुकाध्यक्ष पनवेल मिलिंद देशमुख, उरण दिनेश जोशी, पेण प्रीती फड, माणगाव राजेंद्र पोवार, कर्जत राजे शिंदे ,महाड पोलादपूर नवीन परमार ,बी यु महाजन,प्रियवंदा तांबोटकर, प्रशांत निकम व इतर १५ तालुक्यातील कला शिक्षक या कार्यक्रमाला उपस्थित होते. विद्यार्थी व कलाशिक्षक यांच्यासाठी अविरत काम करणारी रायगड जिल्हा कलाध्यापक संघटना मा. शिक्षण विभाग रायगड जिल्हा परिषद अलिबाग माध्यमिक यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी ही कार्यशाळा घेतली जाते.
अशा प्रकारच्या या कार्यशाळा शिक्षकांना त्यांचे कौशल्य विकसित करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना एक परिपूर्ण शिक्षण देण्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.