Press "Enter" to skip to content

ज्ञानेश्वर म्हात्रे यांना डॉक्टरेट

कोकण विभाग शिक्षक सेनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे डॉक्टरेट पदवीने सन्मानित

सिटी बेल | मुंबई | अमूल कुमार जैन |

राजभवन येथे महात्मा गांधी ग्लोबल पीस फाउंडेशन ” यांच्यावतीने महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष तथा कोकण विभाग शिक्षक सेनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे यांना सन्मानित करण्यात आले आहे.

ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी आजपर्यंत शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात जे अनमोल योगदान दिलेले आहे, गोरगरीब विद्यार्थ्यांना विद्यादान देण्याबरोबरच शिक्षक – शिक्षकेतर बंधू भगिनींच्या न्याय आणि हक्कासाठी अहोरात्र मेहनत अविरत सुरू आहे, तसेच सामाजिक कार्यात स्वत:ला वाहून घेतले आहे. त्या कार्याची दखल घेऊन महात्मा गांधी ग्लोबल पीस फाउंडेशन यांच्यावतीने ज्ञानेश्वर म्हात्रे “डॉक्टरेट”मानद पदवीसाठी नामांकन झाले हाेते.

सदरची “डॉक्टरेट” मानद पदवी वितरणाचा समारंभ महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह काेश्यारी यांच्या हस्ते “राजभवन” मुंबई या ठिकाणी वितरित झाला .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.