जेष्ठ कवी निलेश गीत यांचा वाढदिवस साजरा
सिटी बेल लाइव्ह / कळंबोली / प्रतिनिधी #
कोरोनाच्या महामारीत कळंबोली पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे स्वस्थ नीट नेटके राहावे त्यांचे मनोधर्य वाढावे व पोलिस ठाण्यातील वातावरण नेहमी प्रसन्न राहावे याकरिता नवी मुंबई पोलिस आयुक्त संजय कुमार यांच्या सुचनेनुसार कळंबोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतिश गायकवाड हे नेहमीच प्रयत्नशील राहिले आहेत. पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचे वाढदिवस साजरे करताना त्यांनी पोलिस स्टेशन म्हणजे एक कुटुंब असून सर्वाना खेळीमेळीच्या वातावरणात ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना अवगत असलेल्या गायन कलेने सर्वाना उत्साहित केल्याचे आपण पाहिले आहे.
कळंबोली ली वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतिश गायकवाड यांच्या याच आत्मियतेने कळंबोली पोलिस ठाणे हद्दीत एकटेच राहणारे जेष्ठ नागरिक जे ” फिर एक दिन ” या पुस्तकाचे भारत सरकारच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित, पंडीत दिनदयाळ पुरस्कार, मुबईने सन्मानित यमुनाबाई हिन्दी लेखन पुरस्कार, हैद्राबादने सन्मानित असलेले कवी श्री निलेश गीत (वय ७० वर्षे ) सेक्टर १७ श्री शगुन रेसीडेन्सी रोडपाली- कळंबोली येथे राहत आहेत. त्यांचा आज बुधवार ( दि 29 ) रोजी वाढदिवस असल्याचे समजताच आपल्या सहका-यासह कवी श्री निलेश गीत यांच्या घरी जावून केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करून त्यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सोशल डिस्टंनसिंगचे काटेकोर पालन करण्यात आले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतिश गायकवाड हे आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेत हे पाहताच कवी निलेश गीत भारावून गेले. कारण हा त्यांच्या जीवनातील पहिला वाढदिवस असेल की एखाद्या पोलिस अधिकारी येवून माझा वाढदिवस साजरा करतो. त्यांना दोन मुली असून त्या मुंबई व गुजरात येथे राहात असून लाँकडाऊनच्या काळात त्यांना इकडे येवून देखभाल करणे शक्य नाही. पण कळंबोली पोलिस ठाण्याकडून माझी देखभाल केली जात असून मला लागणारे सर्व औषधे व आवश्यक मदत केली जाते. त्याच प्रमाणे वडिलासारखी माझी विचारपूस करता हे सांगताना त्यांना गहिवरून आले.
भरोसा सेल अंतर्गत नवी मुंबई आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात एकटे राहणारे जेष्ठ नागरिकांची काळजी घेताना सर्व पोलिस ठाण्यामध्ये जेष्ठ नागरिक कक्षाची स्थापना केल्याने नवी मुंबई पोलिस आयुक्त संजय कुमार व कळंबोली वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतिश गायकवाड यांचे सर्व समाजातून स्वागत केले जात आहे.






Be First to Comment