मराठी माध्यमातून कनिष्का भिसे पाहिली : इंग्रजी माध्यमातून अक्षय मौर्य प्रथम
सिटी बेल लाईव्ह/ पनवेल.
आज लागलेल्या एसएससी शालांत परीक्षांच्या निकालात शामल मोहन पाटील एज्युकेशन संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलने नेत्रदीपक यश पटकावले आहे. कळंबोली येथील या संस्थेच्या मराठी माध्यमाचा निकाल 98.46 टक्के लागला असून इंग्रजी माध्यमाचा निकाल 99.69 टक्के लागला आहे.एच एस सी पाठोपाठ दहावी च्या विद्यार्थ्यांनी देखील नेत्रदीपक यश प्राप्त केल्यामुळे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक सतीश पाटील यांच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव होत आहे.
उत्तमोत्तम शैक्षणिक मूल्य प्रदान करण्याच्या उद्देशाने सतत प्रयत्नशील असणारे नगरसेवक सतीश पाटील यांच्या खंबीर प्रयत्नांतून ही संस्था उभी राहिली आहे. समाजाच्या प्रत्येक स्तरातून येणाऱ्या विद्यार्थ्याला आपल्या शाळेतून अत्युच्च दर्जाचे शिक्षण दिले जाईल यासाठी ते कार्यमग्न असतात. मनापासून अध्यापनाचे कार्य करणारे शिक्षकवृंद हेच या यशाचे गमक असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
मराठी माध्यमातून कनिष्का बाबली भिसे हिने 95.40 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला,91.80 टक्के गुण मिळवत निकिता अनिल यादव दुसरी आली तर तिसरा क्रमांक पटकावणारी शिवकन्या नामदेव हजारे हिला 91.20 गुण मिळाले.इंग्रजी माध्यमात अक्षय सर्वेश मौर्य याने प्रथम क्रमांक पटकावताना 95.6 टक्के गुण मिळवले.92.6 टक्के मिळवणारा साहिल शुक्राचार्य ठाकूर दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला, तर प्रथमेश हेमंत मगर याने 92.4 टक्के गुण मिळवत तिसरा क्रमांक मिळविला. संस्थापक अध्यक्ष नगरसेवक सतीश पाटील यांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तर त्यांना शिकविणाऱ्या तमाम शिक्षक वृंदाचे कौतुक केले.






Be First to Comment