सिटी बेल लाइव्ह / पनवेल/ (प्रतिनिधी)
मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या(१०वी, S S C) माध्यमिक शालांत परीक्षेत यावर्षी देखील दरवर्षीप्रमाणे कळंबोली येथील सेंट जोसेफ हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजचा निकाल १०० टक्के लागलेला आहे.
शाळेत प्रथम क्रमांक मिळवून कु. आदिती मीना व कु.अफजान जमादार या दोघांनी ९६.२० % गुण प्राप्त करून आपले स्थान प्रस्थापित केलेले आहे.
अफजान जमादार याने मिळवलेले हे यश पूर्णपणे स्वबळावर तसेच कोणतेही बाह्य मार्गदर्शन न घेता मिळविलेले आहे त्याचप्रमाणे कु. अदिती मीना हिने देखील आपल्या मधुमेहावर मात करून हे यश संपादन केले आहे. दोघांनीही शाळेतील शिक्षकांना त्यांच्या यशाचे पूर्णपणे श्रेय दिलेले आहे.
त्याचप्रमाणे कु. मंथन ठाकरे 95.8 टक्के व लावण्या चौधरी 95.5 टक्के गुण प्राप्त करून हे अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. ए. एफ पिंटो व व्यवस्थापिका श्रीमती ग्रेस पिंटो यांनी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केलेले आहे.






Be First to Comment