कर्जत मधील घटना : ऑनलाईन बॅकींग द्वारे एनएफटी करुन 1 लाख 25 हजार रुपयांची फसवणुक
सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
ऑनलाईन बॅकींग द्वारे एनएफटी करुन घेवुन फिर्यादी यांची 1 लाख 25 हजार रुपयांची फसवणुक केली आहे.याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कर्जत पोलीस ठाणे हद्दीत दि.11ऑक्टोबर ते दि.13 ऑक्टोबर 2021 रोजी च्या दरम्यान फिर्यादी रा. वदप गौरकामत ता.कर्जत यांना आरोपित नं.01 याने त्याचे मोबाईल वरुन फिर्यादी यांचे मोबाईल नंबरवर फोन करुन मी रिव्होल्ट मोटर्स कार्यालयातुन सेल्स मॅनेजर बोलत आहे असे बोलत आहे असे खोटे सांगुन कंपनीचे सिनीयर सेल्स मॅनजर आरोपित नं.02 यांचेशी फोनवर फिर्यादी यांचे बोलणे करुन देवुन आरोपित नं.02 याचे मोबाईल नंबरवर फिर्यादीचे आधार कार्ड ,पॅन कार्ड,आयकर पत्र जीएसटी नंबरचे पत्र विदयुत मिटरचे बिल, आयात निर्यात लायसन्स पाठविण्यास सांगुन फिर्यादी याचा विश्वास संपादन करुन घेवुन फिर्यादी यांना ईलेक्ट्रीक बाईकचे रिव्होल्ट मोटर्स कंपनीचे डिलरशीपसाठी रिव्होल्ट मोटर्स स्टेट बॅक ऑफ इंडिया शाखा गुरगाव येथिल बॅक खाते क्रंमाक 35951665012 यावर 1,25,000/- रुपये ऑनलाईन बॅकींग द्वारे एनएफटी करुन घेवुन फिर्यादी यांची फसवणुक केली आहे.
याबाबत कर्जत पोलीस ठाणे येथे गु.र.नं.279/2021 भा.दं.वि.क. 420 , माहिती तंत्रज्ञान अधिनियम, 2000 (2008 चे सुधारणेसह) 66(c) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास महिला पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की ह्या करीत आहेत.








Be First to Comment