Press "Enter" to skip to content

चिंतामणराव केळकर विद्यालयात अनिकेत तेरेदेसाई सर्वप्रथम

सिटी बेल लाइव्ह / अलिबाग #

मार्च 2020 मध्‍ये झालेल्‍या दहावीच्‍या परीक्षेत अलिबाग तालुक्‍यातील चेंढरे येथील चिंतामणराव केळकर विद्यालयाचा निकाल सलग सातव्‍या वर्षी 100 टक्‍के लागला आहे . अनिकेत संदीप तेरेदेसाई हा विद्यार्थी 96.40 टक्‍के गुण मिळवत शाळेत पहिला आला .
यावर्षी शाळेतून 131 विद्यार्थी दहावीच्‍या परीक्षेस बसले होते ते सर्व उततीर्ण झाले . यामध्‍ये मराठी माध्‍यमाचे 57 तर इंग्रजी माध्‍यमाच्‍या 74 विद्यार्थ्‍यांचा समावेश आहे .  शाळेच्‍या 13 विद्यार्थ्‍यांनी 90 टक्‍के किंवा त्‍यापेक्षा अधिक गुण मिळवले आहेत . तर 80 ते 89 टक्‍के पर्यंत गुण मिळवणारया विद्यार्थ्‍यांची संख्‍या 36 आहे . इंग्रजी माध्‍यमात अनिकेत तेरेदेसाई हा विद्यार्थी 96.40 टक्‍के (482) गुण मिळवत  पहिला आला . तन्‍वी शरद पाटील ही विद्यार्थिनी  96 टक्‍के गुण मिळवून दुसरी आली . तर आर्या  संतोष गुरव हिने 94.80 गुणांसह तिसरया क्रमांकावर बाजी मारली आहे . मराठी माध्‍यमात रूचा मंगेश विरकूड हिने 96 टक्‍के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला . निकीता फड हिने 90 टक्‍के गुणांसह दुसरा क्रमांक मिळवला तर चारूता कामतने 89.60 गुणांसह तिसरा क्रमांक पटकावला . संस्‍थेचे चेअरमन अमर वार्डे यांचयासह शाळेच्‍या शिक्षकांनी यश्‍स्‍वी विद्यार्थ्‍यांचे अभिनंदन केले आहे .

 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.