Press "Enter" to skip to content

खालापुरात महीलेचा विनयभंग

परप्रांतीय कंपनी मॅनेजर ची महिला सहकारी कडे शरिरसुखाची मागणी : गुन्हा दाखल

सिटी बेल | खालापूर | मनोज कळमकर |

तालुक्यातील ज्योती स्टिल कारखान्यात काम करणाऱ्या महिला सहकारीचा विनयभंग तसेच तिच्या कडे शरिरसुखाची मागणी करणा-या दिवाकर ओझा ( रा.बोनझ्रर सोसायटी के 306 ताकई, पो.साजगांव ता.खालापुर ) विरोधात पीडितेनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पीडिता हि खोपोली शहरात राहणारी असून ज्योती स्टिल कारखान्यात उच्च पदावर काम करीत होत्या. दिवाकर ओझा हा प्लांट मॅनेजर असून ओझा याला कामाचा अहवाल देण्याचे काम पीडितेचे होते. गेल्या सहा महिन्यापासून ओझा पीडितेला सातत्याने शारिरीक व मानसिक त्रास देत होता. तिच्या कडे बघुन अश्लिल हावभाव , हात पकडुन व शरीरावरून हात फिरवुन मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून ओझा ने विनयभंग केला . तसेच शरिरसुख दिल्यास पगार वाढ देण्याचे आमिष ओझा पीडितेला दाखवत होता. पीडितेनी विरोध केल्याने ओझाने तिला त्रास देत नोकरी सोडण्यास भाग पाडले.असह्य झाल्यावर पीडितेनी सर्व प्रकार घरी सांगितला.

याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार घेण्याचा निर्णय घेऊन दिवाकर ओझा विरोधात खोपोली पोलीस ठाणे तक्रार देण्यात आली. ओझा विरोधात पोलीसांनी
भा.दं.वि.कलम.354,354(अ),509,506 प्रमाणे गुन्हा दाखल केला. दिवाकर ओझा याला अद्याप अटक करण्यात आली नाही. अधिक तपास सपोनि एस काळसेकर हे करीत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.