बारा शाळांचा शंभर टक्के निकाल
सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर)
2019-20या शैक्षणिक वर्षात पार पङलेल्या दहाविची परिक्षेचा निकाल बुधवारी ऑनलाईन जाहिर झाला असून खालापूर तालुक्याचा निकाल 93.03 टक्के लागला असून उज्वल यशाची परंपरा कायम राहिली आहे.तालुक्यातून अङतीस शाळेतून 2570 विद्यार्थी परिक्षेसाठी बसले होते.त्यापैकी 2391 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.635 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उतीर्ण झाले आहेत. 873 विद्यार्थ्याना प्रथम श्रेणी तर व्दितीय श्रेणीत 656 विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत. 227 विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.तालुक्यातील बारा शाळांचा शंभर टक्के निकाल लागला असून सर्वात कमी निकाल 55.26टक्के शाहू महाराज माध्यमिक शाळा वासरंग आणि खरसुंङी येथील द.शि.जाधव शाळेचा 61.90 टक्के लागला आहे.






Be First to Comment