सिटी बेल लाइव्ह /खांब-रोहे, (नंदकुमार मरवडे)
मार्च २०२० दहावी परीक्षेचा निकाल लागला असून रोहे तालुक्यातील नशिप्र मंडळ खांब या शिक्षण संस्थेच्या श्रमिक विद्यालय चिल्हे येथील विद्यार्थीनी श्रुतीका देवजी कचरे हिने ९०.६०%गुण संपादित करून विद्यायलात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा बहुमान पटकावला आहे.
विद्यालयाने परंपरेने आपल्या उज्ज्वल निकालाची परंपरा याही वर्षी कायम राखत या शैक्षणिक वर्षांचाही विद्यालयाचा एकूण निकाल ९७.९१ %इतका लागला असून प्रथम क्र.श्रुतीका देवजी कचरे ९०.६०%,द्वितीय क्र.सानिका सुरेश रसाळ ९०.००%,तुतीय क्र.साक्षी सुनील पुगावकर ८९.२० चतुर्थ क्र.साक्षी बाबूराव कान्हेकर ८५.८०%,तर पंचम क्र.साक्षी प्रभाकर महाडिक व सुदेश संतोष ठाकूर ८१.६०%
यांनी पटकावले आहेत.
विद्यार्थी वर्गाने मिळविलेल्या या सुयशाबद्दल संस्थापक-अध्यक्ष श्री.रा.ग.पोटफोडे(मास्तर)विद्यमान चेअरमन महेंद्र पोटफोडे, उपाध्यक्ष राम कापसे,सचिव धोंडू कचरे,शा.व्य.समिती चेअरमन धनाजी लोखंडे, शालेय समिती चेअरमन वसंत मरवडे व सर्व संचालक मंडळ,मुख्याध्यापक दीपक जगताप, पर्यवेक्षक नरेंद्र माळी व सर्व शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग तसेच विभागातील शिक्षणप्रेमी नागरिकांनी अभिनंदन व्यक्त करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.






Be First to Comment