Press "Enter" to skip to content

शेतकऱ्यांनी आता जगायचे कसे ? भू माफियांचा आतंकी हैदोस

पेरलेले पीक टाकले उपटून : शेतात टाकण्यासाठी आणल्या दोन टेम्पो भरून काचा

सिटी बेल लाईव्ह / पनवेल #

भारत हा कृषिप्रधान देश आहे. परंतु पनवेल तालुक्यातील खानाव गावच्या शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने त्रास देण्यात येत आहे तो पाहता भारत हा खरोखरच कृषिप्रधान देश आहे का? हा प्रश्न कुणालाही पडेल. जमिनीच्या वादाच्या मधून येथे एका भूमाफिया ने शेतकऱ्याचे लावलेले भाताचे पीक उपटून फेकण्याचा अश्लाघ्य प्रकार केला आहे. एवढ्यावरच न थांबता पुन्हा शेतकऱ्यांनी शेतात जाऊ नये या उद्देशाने दोन टेम्पो भरून फुटलेल्या काचांचा खच टाकण्याचा निंदनीय प्रयत्न देखील भूमाफिया ने केला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की खानाव गावाच्या हद्दीत दीपक भोपी नामक शेतकरी येथील दोन एकर जमीन पिढ्यानपिढ्या न पासून कसत आहेत. सदर जमीन आपली असल्याचा दावा नेरे येथील दत्तात्रय पाटील यांनी केला असल्याने या जमिनीच्या बाबतीत वादंग निर्माण झाला आहे.या बाबतीत सामंजस्याने वाद सोडवण्यासाठी देखील प्रयत्न करता आले असते अथवा न्यायालयाचे दरवाजे ठोठावत न्याय मागता आला असता परंतु पाटील यांनी कायदा हातात घेत भोपी यांच्या शेतात घुसून लावणी केलेले भाताचे सारे आव्हान उपटून टाकले. गटारी अमावस्या च्या आदल्या रात्री त्यांनी भात उपटून टाकल्यानंतर भोपी कुटुंबियांनी त्याच आव्हानाची पुन्हा लावणी केली. दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या अंधारात भाडोत्री इसम घुसवत भाताचे पीक पुन्हा उपटून फेकण्यात आले. एवढ्यावरच न थांबता मंगळवारी मध्यरात्री तब्बल दोन टेम्पो भरून फुटलेल्या बाटल्यांचा खच आणून तो शेतात टाकण्याचा प्रयत्न केला गेला. यावेळी गोपी कुटुंबीय सावध होते, त्यांनी रात्रभर जागता पहारा ठेवला होता.काचा टाकण्यासाठी आलेल्या इसमांना पकडून त्यांनी पनवेल तालुका पोलिसांच्या स्वाधीन केले.

भूमी अधीक्षक अभिलेख,रायगड यांच्या कार्यालयाच्या माध्यमातून कार्यान्वित करण्यात आलेली गट स्कीम दोष पूर्ण असल्यामुळे अशा प्रकारचे जमिनीचे वादंग निर्माण होत असल्याचे खानाव गावच्या शेतकऱ्यांनी सांगितले. दीपक भोपी यांच्या शेतातील पीक उपटण्याच्या या प्रसंगा पाठी देखील सदोष गट स्कीम असल्याचे समजते. शेतकऱ्यांना विश्‍वासात न घेता एके ठिकाणी बसून अंदाजे जमिनींच्या सीमा अधोरेखित केल्या गेल्या असल्याचा शेतकरी आरोप करत आहेत.या स्कीम मुळे जवळ जवळ 100 शेतकरी पिडीत असल्याचे समजते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.