Press "Enter" to skip to content

शेतकरी दिनानिमित्त महिलांचा सत्कार

गोळेगणी येथे महिला शेतकरी दिनानिमित्त महिलांचा कृषीकन्या म्हणून हृद्य सत्कार

सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर |

‘जिच्याहाती पाळण्याची दोरी ती जगाला उध्दारी’ अशा नारीशक्तीचे कृषीक्षेत्रामध्येदेखील बहुमोल योगदान असल्याने या महिला शेतकऱ्यांचा महिला शेतकरी दिनानिमित्त गौरव होणे उचित असल्याचे मत महाड उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी ताटे यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सरपंच नितीन मोरे, तालुका कृषी अधिकारी सूरज पाटील, कृषी पर्यवेक्षक श्रीरंग मोरे, कृषी सहायक मनोज जाधव, अनिल डासाळकर, महेश कदम, प्रसाद भोकरे, श्रीमती अंजूम मोमीन, आत्माचे कपिल पाटील, माजी सरपंच प्रभाकर पवार, कृषीमित्र नामदेव येरूणकर, रोजगारसेवक शेखर येरूणकर, प्रगतशील शेतकरी ज्ञानेश्वर मोरे, सुरेशराव मोरे व प्रकाश मोरे आदी उपस्थित होते.

यावेळी तालुका कृषी अधिकारी सुरज पाटील यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया लघुउद्योग योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घेण्याचे आवाहन केले.

यावेळी गोळेगणी गावातील कृषीपूरक आणि बचतगट माध्यमातून उल्लेखनीय कामाबद्दल प्रांजली पवार, जान्हवी मोरे, उषा मोरे, रेखा येरूणकर, उषा येरूणकर, आश्विनी येरूणकर आणि पूजा मोरे यांचा कृषी कन्या म्हणून गौरव करण्यात आला. यावेळी बहुपिक पध्दतीने शेती करणारे ज्ञानेश्वर मोरे, दीपक मोरे, अनिकेत मोरे, सागर मोरे, सुरेशराव मोरे यांचा त्यांच्या शेतामध्ये जाऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक मनोज जाधव यांनी केले तर स्वागत तसेच सूत्रसंचालन सचिन दरेकर यांनी केले. कृषी पर्यवेक्षक श्रीरंग मोरे यांनी आभार मानल्यानंतर या महिला शेतकरी दिनाच्या कार्यक्रमाची सांगता झाली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.