कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत 49 हजाराची चोरी
सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
कर्जत पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 08 ऑक्टोबर ते दि.27 ऑक्टोबर 2021 रोजी 12:30 वा च्या दरम्यान अज्ञात चोरटयाने फिर्यादी रा.तुलसी आंगन सोसायटी बिल्डींग नं.09,रुम नं.04, कचेरी रोड कर्जत यांच्या यांचे घराचा दरवाजाचे लॉक चावीने उघडुन डी.सी.एल. आर. कॅमेरा, जॉनी वॉकर स्कॉच, साउंड सिस्टीमचा स्पीकर असा एकूण 49,000/-रुपये किमतीच्या वस्तु फिर्यादी यांचे संमतीशिवाय लबाडीचे हेतूने स्व:ताचे फायदयाकरीता फिर्यादी चोरुन नेल्या व पुन्हा लॉक बंद केले.
याबाबत कर्जत पोलीस ठाणे येथे गु.र.नं.276/2021 भा.दं.वि.क.380 गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास सहाय्यक फौजदार जगताप हे करीत आहेत.








Be First to Comment