सिटी बेल लाइव्ह / आवरे (प्रतिनिधी )
माध्यमिक शाळांत घेण्यात आलेल्या परीक्षा मार्च 2020 निकालात रामचंद्र म्हात्रे विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स ,सायन्स अँड कॉमर्स आवरे मध्ये सेमी इंग्रजी या माध्यमातून कुमारी प्रणया प्रभाकर गावंड या विद्यार्थिनीने तब्बल 90.00%गुण मिळवून विद्यालयात सर्वप्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे. विद्यालयाच्या नावलौकिकास धवल यश प्राप्त करीत , तसेच दरवर्षी ची निकालाची परंपरा कायम राखीत सर्वच विभागाचा निकाल म्हणजे सेमी इंग्रजी व मराठी माध्यम चा निकाल हा विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट लागला आहे . विद्यालययाचा एकूण निकाल (97.97%)
उत्तम यश मिळवणारे यशाचे मानकरी प्रथम – कुमारी प्रणया प्रभाकर गावंड 90.00%(450) गुण
द्वितिय- कुमारी मानसी उदय म्हात्रे 85.00%(425)गुण
तृतीय -कुमार पाटील करण जानबा 84 .60%(423) गुण
या सर्व यशश्वी विद्यार्थिनचे सर्व स्तरातून विशेष अभिनंदन केले जात आहे .
ज्ञानप्रसारक शिक्षण संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे सर संस्थेच्या खजिनदार, सौ. पुष्पलता म्हात्रे, विश्वस्त.श्री. राजेंद्र म्हात्रे सर, विश्वस्त सौ .मेघा म्हात्रे.विशेष कार्यकारी अध्यक्ष. डॉ.संदेश म्हात्रे, विद्यालयाचे प्राचार्य श्री. गायकवाड सर , शिक्षकवृन्द , व शिक्षकेत्तर कर्मचारी व यशश्वी विद्यार्थीचे पालक यानी विशेष कौतुक केले आहे.






Be First to Comment