रसायनी पोलिसांची गावठी हातभट्टीवर तीन महिन्यांत सातव्यांदा कारवाई : वाशिवली डोंगराळ भागातील अड्डा उध्वस्त
सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
रसायनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाशिवली डोंगराळ भागात गैरकायदा गावठी दारुची हातभट्टी असल्याची माहिती रसायनी पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार पोलिस निरीक्षक कैलास दादाभाऊ डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली रसायनी पोलिसांनी शिताफीने छापा टाकून गैरकायदा गावठी हातभट्टीचा अड्डा गुरुवार सकाळी उध्वस्त केला आहे.ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक कैलास डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक मंगेश लांगी,जयवंत बैकर, पोलिस हवालदार सचिन चौरे यांनी कारवाई केली.
यात बेवारस स्थितीत मिळून आलेले 200 लिटर क्षमतेचे 3 प्लास्टिक ड्रममध्ये व 200 लिटर क्षमतेची एक पत्र्याच्या टाकीमध्ये तांबड्या रंगाचे उग्र वास येत असलेले एकूण 800 लिटर रसायन मिळून आले.सदरील रसायन जागीच ओतून नाश करून 3 प्लास्टिकचे ड्रम जाळून नष्ट केले.व एक पत्र्याची टाकी तोडून नुकसान केले आहे.

रसायनी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदावर कैलास दादाभाऊ डोंगरे यांनी पोलिस ठाण्याचा कार्यभार सांभाळताच गैरकायदा हातभट्टी अड्डे उध्दवस्त करण्यावर लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येते.तीन महिन्यांचा कालावधीत ही सातवी घटना असून वाशिवली डोंगराळ भागात गैरकायदा हातभट्टीवर छापा टाकण्याची पाचवी वेळ आहे.








Be First to Comment