नागोठण्यात बकरी ईद साजरी होणार उत्साहात व नियमाच्या चौकटीत
सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) :
मुस्लिम समाजात बकरी ईदला फार महत्व असते. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सण सणावरे साजरे करण्यासाठी काही निर्बंध आलेले असले तरी नागरिकांच्या भावनेचा आदर करून शासनाने यासाठी नियमावली तयार केली असून या नियमावलीचा योग्य प्रकारे आदर राखून नागोठण्यातील मुस्लिम बांधव शनिवार दि. १ ऑगस्ट रोजी बकरी ईद उत्साही वातावरणात साजरी करणार आहेत. बकरी ईद निमित्त मुस्लिम बांधवांनी कुर्बानीचे बकरे देखील आणलेले असून त्यांना चांगल्या प्रतीचा चारा पाणी दिला जात आहे.
बकरी ईद विषयी सखोल माहिती देताना गोडसई (नागोठणे ) येथील दर्ग्याचे पुजारी लियाकतबाबा मांडलेकर म्हणाले की हिंदू लोक दीप अमावास्येला गटारी अमावास्या म्हणून साजरी करतात . गटारी म्हणजे मनसोक्त दारू, मटण, कोंबड्या, खेकडे खाणे. अनेक लोकांना धर्माच्या संकल्पनेची माहितीच नाही . धर्म हिंदू असो व मुस्लिम लोक आरोग्य , स्वास्त्य, त्याग, आत्मशुद्धी , प्रेम , दया ह्या संकल्पना समजतच नाहीत ते फक्त मौज मजा समजतात म्हणून आधी परिपूर्ण धर्म ज्ञान आत्मसात करणेसाठी धर्माचे प्रबोधन होणे गरजेचे आहे. मुस्लिम धर्मात सुद्धा ईद उल अद्धा , म्हणजे त्यागाची ईद म्हणजेच कुर्बाणीची ईद समजतात व मटण खाऊन तो दिवस साजरा करतात. परंतु पैगंबर मोहम्मद यांच्या ५ हजार वर्ष आधी पैगंबर इब्राहिम हे या पृथ्वीतलावर अवतरले होते , ईश्वराची भक्ती करताना ईश्वराने त्यांची परीक्षा घेण्यासाठी स्वप्नात त्यांनी सांगितले तुझ्या सर्वात प्रिय, आवडत्या गोष्टीचे परमेश्वराच्या नावाने त्याग कर अशी आज्ञा सतत तीन दिवस स्वप्नात दिली.
निपुत्रिक असलेल्या पैगंबर इब्राहिम याना वयाच्या ८० व्या वर्षी पुत्र प्राप्ती झाली होती. आता पुत्रापेक्षा प्रिय काय असेल ? म्हणून पैगंबर पुत्र इस्माईल यांचे त्याग करण्याचा निर्णय घेतात व त्यांना सौदी अरब मधील एक ठिकाण मीना येथे घेऊन जातात व त्यांना कल्पना देतात की मी तुला सर्वश्रेष्ठ परमेश्वराच्या इच्छे नुसार कुर्बान ( त्याग ) करण्यासाठी घेऊन चाललो आहे .
तेव्हा पैगंबर इस्माईल हे त्यांना बाबा तुमच्या डोळ्यावर कपडा बांधा वं मग मला कुर्बान करा असे सांगतात आणि कुर्बाणीच्या जागेवर जमिनीवर झोपतात . पैगंबर इब्राहिम आपल्या स्वतःच्या मुलाच्या गेल्यावर परमेश्वराच्या नावाने सूरी फिरवतात . नंतर परमेश्वराच्या आराधना करणेसाठी डोळ्यावरची पट्टी सोडतात तर पाहतात की , एक मेंढा त्यांच्या हातून कापला गेला आहे व पुत्र इस्माईल जिवंत उभे आहेत त्यांच्या बाजूला फरित्ता जिब्राईल ( गाबरीयल ) उभे आहेत व पैगंबर इब्राहिम याना संदेश देतात की , तुम्ही परमेश्वराच्या परीक्षेत व भक्तीत परिपूर्ण उतरला आहेत , परमेश्वर तुमच्या अरधनेवर प्रसन्न आहे .
ती प्रथा आजही दरवर्षी जिल्हज्जा महिन्याच्या १० तारखेला हज ची नमाज झाल्यानंतर पार पाडली जात आहे . व जो पर्यंत पृथ्वी अस्तित्वात आहे ही पैगंबर हजरत इब्राहिम यांनी दिलेली कुर्बानी म्हणून पार पाडली जाईल .






Be First to Comment