खालापूर तालुका शिक्षक सेनेची चौक दगडी शाळेत शिक्षक संघटनेची सभा संपन्न
सिटी बेल | काशिनाथ जाधव |
पाताळगंगा |
गेल्या दोन वर्षापासून कोरोनांचे संकट असल्यामुळे शिक्षकांच्या रोजच्या येणाऱ्या समस्या कोठे मांडणार मात्र कोरोनाचा आलेख घसरल्याने नुकताच दगडी शाळा येथे चौक खालापूर तालुका शिक्षक सेनेची प्रथम सभा जि. प. सदस्य मोतीराम ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली या वेळी शिक्षक सेनेची कार्यकारणी जाहीर करण्यात आली.शिक्षक सेनेचे अध्यक्ष जितेंद्र ठाकूर यांनी शिक्षकांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही आणि वाडी वस्तीवरील शिक्षणक्षेत्रात काम करणारे शिक्षकांची सर्व कामे त्वरीत पूर्ण करू असे आश्वासन यावेळी देण्यात आले.
सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अ. झि. ठाकूर गुरुजी यांचे ही मार्गदर्शन लाभले. एकीच्या बळाचे महत्व सांगून सर्वांनी एकत्र येऊन काम करा.या कार्यक्रमास उरण तालुका शिक्षक सेना अध्यक्ष कौशिक ठाकूर,शशी ठाकरे यांचेही मार्गदर्शन लाभले. यावेळी संदीप पाटील ,अध्यक्ष शिक्षक संघ तालुका खालापूर यांनी शुभेच्छा दिल्या.राजेंद्र फुलावरे राज्य अध्यक्ष यांनी जुनी पेन्शन, हक्क संघटन ,या विषयावर मार्गदर्शन केले.
यावेळी संतोष निघोट, कैलास मोरे, चौक शाळेचे मुख्याध्यापक. राठोड सर, हातनोली शाळेचे मुख्याध्यापक चौव्हाण सर, राहुल गायवाड सर. मोहन दळवी, महेश म्हात्रे, मस्तान बरगे, संदीप सुर्वे, भिकू पाटेकर, गाडे सर. चंद्रशेखर शिंदे, अशोक खेडकर, ज्ञानेश्वर मरागजे, सवळे सर, विक्रम गायकवाड, न. बू. गायकवाड सर, सुधीर राठोड, संदीप बा. पाटील, गायकर सर, बबन दावभट, सचिन नवले, शरद राळे ,अबा कदम सर महिला प्रतिनिधी सुनीता म्हात्रे मॅडम, अनिता पाटील, अश्विनी शिंगे, ताठे मॅडम, मोठ्या संख्येने शिक्षक वर्ग उपस्थित होते.








Be First to Comment