सिटी बेल लाइव्ह / खांब-रोहे (नंदकुमार मरवडे)
रोहे तालुक्यातील नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब या शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल विठ्ठलवाडी-राजखलाटी या विद्यालयाने इ.१० वी बोर्ड परीक्षा १००% निकालाची आपली परंपरा कायम राखली असून ऋतिक लक्ष्मण धनावडे याने ८६.२०%इतके गुण मिळवून विद्यालयात प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला आहे.
विद्यालयाचे स्थापनेपासून विद्यालयाने १० वी बोर्ड परीक्षा १००% निकालाची परंपरा कायम राखली असल्याने विद्यार्थी व विद्यालयाचे सर्वत्र कौतूक होताना दिसत आहे. विद्यालयाचे निकालात ऋतिक लक्ष्मण धनावडे ८६.२०%,द्वितीय क्र.राज रामदास आमले ८४.४०%,तुतीय क्र.हरेश भालचंद्र चव्हाण ८०.४०%,चतुर्थ क्र.नंदिनी सुमीत निंबाळकर ८०.२०% तर पंचम क्र.साक्षी संदीप गायकवाड ७३.४०% यांनी पटकावले आहेत.
विद्यार्थी वर्गाने मिळविलेल्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन महेंद्र पोटफोडे, उपाध्यक्ष राम कापसे व सर्व संचालक मंडळ तसेच शाळा व्यवस्थापन समिती चेअरमन हरिश्चंद्र धामणसे,शाळा समिती चेअरमन बिनदास्त धनावडे,मुख्याध्यापक अनिल खांडेकर,सहा शिक्षक शिल्पा मरवडे,अर्चना मरवडे,सुप्रिया जाधव,गौतम जाधव,ऋषिकेश महाडिक,सुजित लोखंडे,नितेश पोटफोडे आदी शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी व्रुंद व विभागातील शिक्षण प्रेमी नागरिकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व्यक्त करून शुभेच्छा दिल्या आहेत.






Be First to Comment