तालुक्यात एकूण 27 रुग्ण, 14 रुग्णांची कोरोनावर मात
सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत)
रायगड जिल्ह्यातील अन्य तालुक्यांच्या तुलनेत सुधागड तालुक्यात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात असल्याचे दिसते. तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत कधी घट तर कधी अचानकपणे वाढ होतांना दिसते. मंगळवारी (दि. 28) एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला आहे.
सुधागड तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या आता 27 वर पोहचली आहे. यातील 14 जण बरे होऊन घरी परतले आहेत. तर 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आणि 12 जणांवर उपचार सुरू आहेत. अशी माहिती सुधागड-पाली तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.






Be First to Comment