रायगड प्रिमियर लिग स्पर्धेतील बाद फेरीची स्पर्धा संपन्न
सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |
लिलावात बोली न लागलेल्या खेळाडुंना कौशल्य सिद्ध करण्यासाठी घेण्यात आलेल्या बाद फेरीच्या स्पर्धेचे एच संघाने विजेतेपद मिळविले. स्पर्धेत के संघाने उपविजेतेपद मिळविले. विजेत्या उपविजेत्या संघांतील प्रत्येक खेळाडूला आकर्षक पदक देण्यात आली. अंतिम सामन्यातील उत्कृष्ट खेळाडु म्हणून राहूल भोईर याची निवड करण्यात आली. या स्पर्धेतून उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या १६ खेळाडुंची निवड करण्यात आली असून त्यांची विभागणी मुख्य स्पर्धेकरीता निवडण्यात आलेल्या संघांमध्ये करण्यात येणार आहे.
स्पर्धक खेळाडुंना टी शर्ट, प्रत्येक सामन्या वेळी अल्पोपहार देण्यात आला. मोठ्या कालावधीनंतर खेळाडुंना मिळालेली संधीचा आनंद त्यांच्या देहबोलीतून दीसून येत होता. प्रेक्षकांची उपस्थिती आणि उत्कृष्ट आयोजनासाठी संपूर्ण स्पर्धा कायम स्मरणात राहील असे मत खेळाडू आणि उपस्थितांनी बोलून दाखवतानाच मुख्य स्पर्धेची ऊत्कंठा शिगेला पोहोचली असल्याचे सांगितले.
अंतिम सामन्यासाठी रायगड प्रिमियर लिग चे अध्यक्ष राजेश पाटील, उपाध्यक्ष डॉ राजाराम हुलवान, सचिव जयंत नाईक, सहसचिव संदीप जोशी, कार्याध्यक्ष जितेंद्र नाईक, खजिनदार कौस्तुभ जोशी, प्रदीप खलाटे, प्रितम पाटील, चंद्रकांत म्हात्रे, कुणाल पाटील, महेंद्र भातिकरे, सुनील सरगर आणि सहकारी उपस्थित होते. स्पर्धा के.पि.सी.मैदान ईनामपुरी येथे खेळविण्यात आली .








Be First to Comment