सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर)
ग्रामीण भागातील शिक्षणाचा वटवृक्ष अशी ओळख असलेल्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर खालापूरने यंदाची उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली असून दहाविचा निकाल 92.85 टक्के लागला आहे.तालुक्यातील पन्नास वर्षापेक्षा जास्त ज्ञानदानाचे कार्य करणा-या स्वामी विवेकानंद विद्यामंदिरात ग्रामीण भागातील तसेच गरिब व गरजू विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे.यंदा दहविच्या परिक्षला 84विद्यार्थी बसले होते त्यापैकी 78 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.शाळेत प्रथम येण्याचा मान दिक्षा विष्णू पाटील हिने मिळविला असून तिला 82.40 टक्के गुण मिळाले आहेत.मनजिता बापू खंङाळीकर हिला 82.20 टक्के गुण मिळाले असून ती शाळेत दुसरी आली आहे.81.20 टक्के गुण मिळवून विशाल रखूमाजी चवणे हा शाळेत तिसरा आला आहे.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक सुरेश गवारी,दिलासा फाऊंङेशन खालापूर तर्फे अभिनंदन केले आहे.






Be First to Comment