Press "Enter" to skip to content

बर्नींग टेम्पो ची मर्डर मिस्ट्री

द्रुतगती महामार्गावर टेम्पोला लागलेली आग हे जळीतकांड नव्हे तर अनैतिक संबंधातून खून, रसायनी पोलिसांनी खुनाचे रहस्य उघडले

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर १८/९०० वर आयशर टेम्पो क्रमांक MH 12 OW 3656 मध्ये अचानक शॉट सर्किट होवून टेम्पोचा चालक सदाशिव‌ संभाजी चिकाळे (वय 30)रा.पुनावले कोयते वस्ती,ता.मुळशी जि.पुणे हा आगीने होरपळून मयत झाला.याप्रकरणी पोलिस अधीक्षक अशोक दुधे यांनी टेम्पोस आग लागल्यानंतर चालक त्याचा बचाव करण्यासाठी प्रयत्न करणारच असे शक्य असताना या घटनेमागे काहीतरी दडलंय असा संशय व्यक्त करताच रसायनी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली.

यावेळी पोलिस अधीक्षक अशोक दुधे,अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय शुक्ला, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे दयानंद गावडे, पोलिस निरीक्षक शिरीष पवार, पोलिस निरीक्षक अनिल विभुते, यांच्या मार्गदर्शनाखाली रसायनी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास दादाभाऊ डोंगरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक गोरक्षनाथ बालवडकर, पोलिस उपनिरीक्षक धनाजी काळे, पोलिस नाईक विशाल झावरे, राहुल भडाळे,निलेश ठाकूर,मंगेश नाईक, सचिन चौरे, अजिंक्य म्हात्रे,नंदन पाटील आदींनी मृत्यूचा कसून तपास करुन सदाशिवला जिवे ठार मारल्याचे शोधून काढले.

तपासाकरिता पोलीस अधीक्षक,अपर पोलीस अधीक्षक,उप-विभागिय पोलीस अधिकारी खालापुर यांच्या मागदर्शनाखाली रसायनी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास डोंगरे यांनी अकस्मात मृत्युचा तपास करण्याकरता दोन तपास पथक तयार केले होते. मयत सदाशिव हा भिवंडी येथून टेम्पोमध्ये माल भरून पुण्याच्या बाजूकडे जाणा-या सिसिटिव्हि फुटेज प्राप्त केले. त्यामध्ये रसायनी पोलिसांना कामोठे येथे सदाशिव त्याचा टेम्पो नंबर MH 12 QW 3656 हा तेथून जात असताना त्यास एक अनोळखी इसम हा लिप्ट मागून तो अनोळखी इसम हा कामोठे टोल नाका येथून टेम्पोमध्ये बसून पुणे बाजूकडे निघाला.

त्यानंतर रसायनी पोलिसांनी कळंबोळी येथील मुंबई-पुणे एक्सप्रेसवेचे सुरवात होणा-या ठिकाणाचे सि.सि.टि.व्ही फुटेजचे अवलोकन केले असता सदाशिव याचा टेम्पो त्या ठिकाणी न थांबता तो पुणे बाजुकडे निघुन गेला. त्यावेळी रसायनी पोलिसांना सदाशिव यांच्यामध्ये तो एकटा नसुन त्यासोबत लिप्ट मागणारा अनोळखी इसम असताना टेम्पोमध्ये एकच प्रेत कसे ? कामोठे ने एक्सप्रेसवेवरील घटनास्थळ दरम्यान लिप्ट मागणारा इसम कोठे उतरला नाही मग तो कुठे गेला असावा ? म्हणून पोलिसांना संभ्रम झाला.

म्हणून रसायनी पोलिस सावरोली टोलनाका व आजुबाजूने ठिकाणाचे सिसिटिव्हि फुटेज तपासून पाहिले असता खालापुरातील इंडियन ऑईल पेट्रोलपंपावर बाटलीमध्ये पेट्रोल घेणारा इसम मयत याचे टेम्पो नंबर MH 12 QW 3656 मध्ये कामोठे येथून लिप्ट मागणारा अनोळखी इसम असल्याचे निष्पन्न झाले. त्यावेळी सदरील घटनाही घातपाताची पूर्वनियोजित असल्याचे रसायनी पोलिसांना दाट संशय आला.

त्यानंतर रसायनी पोलिसांनी मयताच्या नातेवाईकांकडे चौकशी केली असता त्यांनी २) मल्हारी व्यंकटी केदारे( वय ३९ वर्ष २), मोहन संभाजी व्हगे (वय ३१ वर्षे)दोन्ही रा.पुनावळे, कोयते वस्ती, रसीकवाडी, जांभेरोड, ता. मुळशी, जि. पुणे यांच्यावर संशय व्यक्त केला.हे दोघेही मामा भाचे आहेत. त्याप्रमाणे पोलिसांनी त्यांचे मोबाईल फोनचे सि.डि.आर प्राप्त करून त्याचे अवलोकन केले असता त्या दोघांचे मोबाईल फोन दिनांक १२/१०/२०२९ ने दिनांक १३/१०/२०२१ रोजी दरम्यानच बंद असल्याचे दिसून आले.

त्यानंतर सदाशिव च्या पत्नीने घडलेल्या घटनेबाबत दिलेल्या तक्रारीवरुन रसायनी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर १५३/२०२१ भादंवि कलम ३०२,२०१,४३५,५०६, ४२७,३४ अन्वये दिनांक १७/१०/२०२१ रोजी २२:४१ वाजता गुन्हा नोंद करण्यात आला असून १) मल्हारी व्यंकटी केराळे वय (३६ वर्ष २) मोहन संभाजी व्हगे( वय ३९ वर्षे) दोन्ही रा. पुनावळे कोयते वस्ती, रमकवाडी, जावेगेड, ता. मुळशी, जि.पुणे यांना चौकशी करता ताब्यात घेवून त्याचे अनुषंगाने कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली देवून त्याचे सोबत आणखी एक इसम असल्याचे त्यांनी सांगितले म्हणून त्यांना दिनांक १८/१०/२०२९ रोजी अटक करण्यात आली असून त्यांची मा न्यायालयाने दिनांक २२/१०/२०२९ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली आहे.

रसायनी पोलिसांच्या पथकाने तिसऱ्या आरोपीच्या ही मुसक्या आवळल्या असून त्याला जेरबंद केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.मयत सदाशिव संभाजी चिकाळे आणि आरोपी मल्हारी व्यंकटी केराळे व मोहन संभाजी व्हगे हे तिघे जिवाभावाचे मित्र होते.तिघांनीही एकाच दिवशी तीन टेम्पो खरेदी केले होते.परंतू मल्हारी ची पत्नी आणि मोहनीची बहिण हिच्याबरोबर सदाशिवचे अनैतिक संबंध असल्याचा संशय मल्हारी व मोहनला आल्याने त्यांनी सदाशिवचा प्लॅनिंग मर्डर केल्याचे रसायनी पोलिस ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास दादाभाऊ डोंगरे यांनी बोलताना सांगितले.
याबाबत अशोक दुधे जिल्हा पोलीस अधीक्षक, अतुल झेंडे अपर पोलीस अधीक्षक अलिबाग , उपविभागीय पोलिस अधिकारी संजय शुक्ला , दयानंद गावडे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वये शाखा , शिरिष पवार, पोलीस निरीक्षक, खोपोली पोलीस ठाणे , अनिल विभुत पोलीस निरीक्षक खालापूर, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक कैलास दादाभाऊ डोंगरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बालवडकर, पोलीस उपनिरीक्षक धनाजी काळे, पोलीस हवालदार सचिन चौरे, पोलीस नाईक निलेश ठाकूर, विशाल झावरे, मंगेश लांगी, राहुल भडाळे,अजिंक्य म्हात्रे, नंदन पाटील, पोलीस शिपाई यांनी मृत्युचा कसून तपास करून मयत यास आरोपीत यांनी पूर्वनियोजित जिवे ठार मारल्याचे निष्पन्न करून आरोपीत यांना अटक केली आहे.

मामा भाच्याला खतरनाक प्रीप्लॅनचा रसायनी पोलिसांनी उलगडा लावल्याने रसायनी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास दादाभाऊ डोंगरे यांच्या पोलिस टिमचे कौतुक केले जात आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.