कर्जत शिवसेना विभाग प्रमुख नदीम खान यांच्या वतीने लसीकरण शिबीर : 138 जणांनी केले लसीकरण
सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
कर्जत शिवसेना विभाग प्रमुख नदीम खान, लसीकरण संघर्ष समिती कर्जत, उपजिल्हा रुग्णालय कर्जत आणि कर्जत नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने कोव्हीड-19 प्रतिबंधक लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी 138 जणांनी लसीकरण करून घेतले.
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या विभाग प्रमुख नदीम खान यांच्या शिवसेना संपर्क कार्यालय मध्ये लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, या शिबिरास कर्जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ.पंकज पाटील, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मनोज बनसोडे,उपनगराध्य अशोक ओसवाल, स्थानिक नगरसेविका मधुरा चंदन,नगरसेवक बळवंत घुमरे, उपजिल्हा प्रमुख भाई गायकर,उत्तम जाधव, धर्मेंद्र मोरे, माजी नगरसेवक संतोष पाटील, माजी नगरसेविका बिनीता घुमरे, महेंद्र चंदन आदींनी भेट दिली.
जिल्हा रुग्णालयाच्या डॉ. संगीता दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली नर्स पुनम जगदाळे यांनी लसीकरण केले, त्यांना कर्जत नगरपरिषदेचे रुपेश लाड,संकेत पाटील, शाहीन मुजावर, अनिता मुकू, रोहित मोरे, विनायक पवार, कैलास रूठे यांनी सहकार्य केले.
यावेळी लसीकरण संघर्ष समिती सदस्य अॅड.कैलास मोरे, प्रशांत उगले, विनोद पांडे, कृष्णा जाधव ,शिवसेवक गुप्ता, मुद्फुल डाभिया, मन्सूर बोहरी जयवंत म्हसे, अजय वर्धावे, निलेश हरिश्चंद्रे, सुमेश शेट्ये, प्रशांत सदावर्ते तर नदीम खान मित्र मंडळाचे आरिफ (लाला )चौगुले, शकील शेख, रियाज मुजावर, कयूम शेख, टोनी खान, फरहान चौगुले ,आरिफ करणेकर, फारूक मुल्ला, इमाम करणेकर, वसीम मुजावर, मोसिन कोतवाल, तोसिफ मोमिन, शहाबाज शेख,अझहर जमादार,युसूफ मुजावर, आमिर मनियार उपस्थित होते.
Be First to Comment