Press "Enter" to skip to content

नागोठण्यातील अग्रवाल विद्यामंदिरचा दहावीचा निकाल ९६.५० टक्के

सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) :

सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) :

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज संकेत स्थळावर जाहीर करण्यात आला असून को.ए.सो. च्या येथील बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुलातील अग्रवाल अग्रवाल विद्यामंदिरने ९६.५० टक्कयांसह निकालाचा उच्चांक गाठला आहे. विद्यामंदिरची विद्यार्थिनी कुमारी प्राची प्रवीण कदम ही विद्यार्थिनी ८८.६० टक्के गुणांसह पहिली आली आहे. याच शाळेत कुमारी पूजा अशोक ठाकूर (८७.६० टक्के) व कुमारी मनश्री उमेश वैशंपायन (८६.८० टक्के) या अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा समितीचे अध्यक्ष नरेंद्रशेठ जैन, मुख्याध्यापक उल्हास ठाकूर यांनी अभिनंदन केले आहे.

एस.डी. परमार स्कूलचा १०० टक्के निकाल

भारतीय एजुकेशन सोसायटीच्या वेलशेत येथील एस.डी. परमार इंग्रजी शाळेचा निकाल १०० टक्के लागला असून कुमारी संचिता भोय ८८.२० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली झाली आहे. कु. ओमकार जंबेकर व कुमारी लावण्या पाटील हे दोघे प्रत्येकी ८७.४० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांकाने तर कुमारी सिमरण ठाकूर ही ८५.४० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे भाएसोचे अध्यक्ष किशोर जैन व शाळा समितीचे अध्यक्ष दिनेश परमार यांनी अभिनंदन केले आहे.

नागोठण्यातील होली एंजल्स स्कूलचा निकाल १०० टक्के

नागोठण्यातील नीव सोशियल अँड एज्युकेशन ट्रस्टच्या होली एंजल स्कूलचा दहावीच्या परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे. यामध्ये कुमारी श्रेया रमेश तुरे ही विद्यार्थीनी ९०.६० टक्के गुण मिळवून पहिली आली आहे. कु. अदित अनिल शिर्के (९० टक्के) व कौस्तुभ नामदेव कामथे (८९.६० टक्के) हे विद्यार्थी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा सीमा मुल्कवाड व मुख्याध्यापक विजय मुल्कवाड, उपमुख्याध्यापक मुकेश मिसळ यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

रिलायन्स फाउंडेशन स्कूलचा १०० टक्के निकाल

येथील रिलायन्स फाउंडेशन स्कूल या मराठी माध्यम शाळेचा निकालही १०० टक्के लागला असून कुमारी समृद्धी दिलीप पवार (८५. २० टक्के) ही विद्यार्थिनी पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. तर कु. सर्वेश बाळासाहेब माने (८५ टक्के) व कुमारी पूजा जनार्दन शेलके (८३.६० टक्के) हे विद्यार्थी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे रिलायन्सच्या नागोठणे युनिटचे अध्यक्ष अविनाश श्रीखंडे, शाळा समितीचे अध्यक्ष चेतन वाळंज व मुख्याध्यापिका सिमा कुलकर्णी यांनी अभिनंदन केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.