अरेरे… पनवेलमध्ये २५ वर्षीय तरूणाची गळफास घेवून आत्महत्या
सिटी बेल | पनवेल | वार्ताहर |
अज्ञात कारणावरुन एका २५ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शहरातील रोहिदास वाडा येथे घडली आहे.
या ठिकाणी असलेल्या मारुती अपार्टमेंटमध्ये राहणारे योगेश खैरे याने घरातील सिलींगला असलेल्या हुकला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. इतक्या लहान वयात योगेश ने अशा प्रकारे स्वतः ला संपवल्याने परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.








Be First to Comment