Press "Enter" to skip to content

मस्जिद मध्ये लसीकरण शिबिर

कर्जत मस्जिद येथे पहिल्यांदाच लसीकरण शिबिराचे यशस्वी आयोजन : 235 जणांनी केले लसीकरण

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

मुस्लिम मस्जिद ट्रस्ट कर्जत, लसीकरण संघर्ष समिती, कर्जत नगरपरिषद व उपजिल्हा रुग्णालय कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने मशिदीमध्ये शिबिराचे आयोजन करण्यात आले.यावेळी 235 जणांनी लसीकरण करून घेतले. सर्व जाती-धर्माच्या लोकांनी मशिदी मध्ये येऊन लसीकरण करून घेतले विशेष सर्व महिलांनी लसीकरण करून सहभाग नोंदविला.

एकता अखंडता व मानवतेचा संदेश त्यामुळे सर्व कर्जत तालुक्यात सर्वदूर पसरला सर्वांचे रक्त सारखेच असते एकमेका सहाय्य करणे सहकार्य करणे हेच महत्त्वाचे माणुसकी हाच खरा धर्म असतो हे आजच्या लसीकरण शिबिरा मध्ये लोकांच्या सहभागातून दिसून आले. जीवन हे अमूल्य आहे, ते जाती, धर्म व पक्षाच्या ही पलीकडे आहे. माणुसकीचा धागा हा सर्वाना जोडणारा असतो हे आजच्या लसीकरण शिबिरातून दिसले.

मुस्लिम मस्जिद ट्रस्टचे इमाम साहेब-हैदर अल्ली अध्यक्ष-सैदू जंगु शेख व सदस्य रशीद मुल्ला, अब्बास मौलाना शेख, निसार शेख, हैदर महंमद शेख, नदीम खान, हमीद खैराट, नदीम कुरेशी,अब्रार शेख,एजाज चौगुले, अमीर मुनीर शेख,झहीर जमीर खान, गुलाम मुर्तुजा, रहीम सलीम शेख, मन्सूर हसन शेख, हसीम खान ,मोसिन सय्यद, मुस्ताक इडरुस, फैजल इडरुस तर कर्जत लसीकरण संघर्ष समितीचे ऍड कैलास मोरे, प्रशांत उगले, विनोद पांडे, कृष्णा जाधव, शिवसेवक गुप्ता, मुद्फुल डाभिया, मन्सूर बोहरी, जयवंत म्हसे, अजय वर्धावे, निलेश हरिश्चंद्रे, सुमेश शेटे, प्रशांत सदावर्ते, किशोर तावरे उपस्थित होते.

शिबिरास नगराध्यक्षा सौ. सुवर्णा केतन जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. मनोज बनसोडे, नगरसेवक बळवंत घुमरे, नगरसेविका स्वामींनी मांजरे, दीपक बेहरे, मंदार मेहंदळे, समीर चव्हाण, हरिभाऊ यादव, डॉ. साजिद अधिकारी यांनी भेट दिली.

उपजिल्हा रुग्णालय डॉ. संगीता दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सिस्टर पुनम जगदाळे यांनी लसीकरण केले. त्यांना रुपेश लाड,संकेत पाटील, शाहीन मुजावर, अनिता मुकू, रोहित मोरे, विनायक पवार, कैलास रूठे यांनी सहकार्य केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.