Press "Enter" to skip to content

जागतिक हात धुवा दिवस साजरा

प्राथमिक शाळा शिहू येथे जागतिक हात धुवा दिवस साजरा

सिटी बेल | मंजुळा म्हात्रे | नागोठणे |

१५ ऑक्टॉबर रोजी जागतिक हात धुवा दिवस सर्वत्र साजरा केला जातो, पण १५ रोजी दसऱ्या निमित्त शाळांना सुट्टी असल्यामुळे १४ ऑक्टॉबर रोजी प्राथमिक शाळा शिहू येथे जागतिक हात धुवा दिवस साजरा करण्यात आला.

सर्वप्रथम शिक्षक सुप्रिया पिंगळे बाईंनी विद्यार्थांना हात धुवण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले व मुख्याध्यापक जीवन ठाकूर सरांनी हात धुवण्याचे महत्व सांगून हात धुवण्याने आपल्या आरोग्याला होणारे फायदे सांगितले. कोरोनाच्या पाश्वभूमीवर हात धुणं किती महत्वाचे आहे ते त्यांनी या वेळी विद्यार्थांना सांगितले.

या वेळी उपस्थित मुख्याध्यापक जीवन ठाकूर, सुप्रिया पिंगळे, संगीता बहिरशेठ, जगताप बाई व विद्यार्थी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.