Press "Enter" to skip to content

सिनियर उतरले मैदानात

सिनियर क्रिकेट क्लबच्या नविन हंगामाची सुरुवात : आमदार प्रशांत ठाकूर यांच्या शुभहस्ते झाले उद्घाटन

सिटी बेल | क्रिडा प्रतिनिधी |

विजयादशमी अर्थात् दसरा…वाईटावर चांगल्याचा विजय मिळविण्याचा हा दिवस.साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवसाला अनन्यसाधारण महत्व आहे.त्यामुळेच आजच्या दिवशी नवीन गोष्टींची सुरुवात करण्यास प्रत्येका चे प्राधान्य असतं.आमदार प्रशांत ठाकूर यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून सिनियर क्रिकेट क्लबच्या नविन हंगामाची सुरुवात करण्यात आली.

उद्घाटनानंतर आमदार प्रशांत ठाकूर यांनी चौफेर फटकेबाजी करत फलंदाजीचा आनंद लुटला.सिनियर क्रिकेट क्लब हा पनवेल मधील नामवंत ज्येष्ठ श्रेष्ठ खेळाडूंचा क्रिकेट क्लब आहे.स्पर्धात्मक क्रिकेटपेक्षा स्वतःच्या फिटनेस ला महत्त्व देत रोज सकाळी हा क्लब नित्यनेमाने क्रिकेटचा आनंद लुटत असतो.समाजाच्या सर्व स्तरांतील खेळाडू एकोप्याने या क्लबमध्ये खेळत असतात.एच ओ सी कॉलनी च्या पाठीमागे,पनवेल तालुका क्रीडा केंद्राच्या पटांगणावर सिनियर क्रिकेट क्लब चे खेळाडू रोज सकाळी सराव करतात .यंदाच्या हंगामाची सुरुवात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या शुभहस्ते झाली.

क्लबचे माजी कर्णधार प्रदीप पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले.आमदार प्रशांत ठाकूर यांनी सीनियर क्रिकेट क्लब च्या खेळाडूंचे या उपक्रमाबद्दल त्यांचे कौतुक करून नवीन हंगामाकरिता शुभेच्छा दिल्या.

यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासमवेत माजी कर्णधार प्रदीप पाटील, माजी नगराध्यक्ष सईद् मुल्ला, नगरसेवक नितीन पाटील, क्लब चे आधारस्तंभ आणि मार्गदर्शक एडवोकेट चंद्रशेखर वाडकर, कर्णधार भाई सुभाष पाटील,प्रमोद पाटील, संजय पाटकर, राजेश शेट्टीया,डॉ ययाति गांधी,डॉ अशिष गांधी,डॉ नितिन पोवले,डॉ संतोष जाधव,डॉ कुमार मिलिंद जोशी,सचिन शेठ,रवींद्र राऊत,सागर ठाकूर,विजय पाटील,अभिजित पाटील,संदीप पाटील, प्रताप गावंड,मंदार नाडगौंडी,कुणाल सावंत,सुहास देशमुख,प्रफुल पेंडसे,सागर आटवणे,त्रिशूल म्हात्रे,रवी घाडगे,अप्पू कुंभार,पाटेकर,राजेंद्र पाटील,सचिन डोंगरे आदी सदस्य उपस्थित होते.

More from क्रिडाविश्वMore posts in क्रिडाविश्व »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.