सिटी बेल लाइव्ह / कळंबोली / प्रतिनिधी #
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गृह विभागाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार शनिवार 1 आँगस्ट रोजीची बकरी ईद साजरी करावी. नमाज घरीच अदा करावी आणि प्रतिकात्मक कुर्बानी करावी असे आवाहन पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केले आहे. त्याचे कळंबोली मुस्लिम बांधवांतर्फ भाजपा रायगड जिल्हा युवा प्रवक्ता जमीर बशिर शेख यांच्याकडून स्वागत करण्यात येत आहे.
कबरी ईदला कुर्बानी देण्या करता आपल्या वैयक्तिक जागेत कोणतीही गर्दी न करता कोविड ( १९ ) या साथीच्या रोगाच्या अटी व शर्थिचे काटेकोर पालन करण्यात येईल या हमीवर परवानगी देण्यात यावी अशी विनंती भाजपचे रायगड जिल्हा सदस्य जमीर शेख यांनी कळंबोली वरिष्ठ निरिक्षण सतिश गायकवाड यांच्याकडे केली आहे. शासन एकीकडे आँनलाईन व दूरध्वनीवरून जनावरे ( बकरी) खरेदी करण्याचे आदेश काढते तर स्थानिक पातळीवर वैयक्तीक ठिकाणी कुर्बानी देण्यास विरोध दर्शवत आहे त्यामुळे मुस्लिम बांधव संभ्रमात आहेत.
कोरोनाच्या महामारीत राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमावर बंदी आहे. त्यामुळे शनिवारी 1 आँगस्टला बकरी ईद करताना अधिक दक्षता घेण्याचे आवाहन पालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. ईदची नमाज मस्जिद , ईदगाह किंवा सार्वजनिक ठिकाणी न करता आपल्या घरीच अदा करावे असे शासनाच्या परिपत्रकात नमुद केले आहे. जनावरांचे बाजार बंद असल्याने नागरिकांना जनावरे खरेदी करायची असल्यास आँनलाईन किंवा दूरध्वनीवरून खरेदी करावीत. प्रतिबंधित ( कंटेन्मेट) क्षेत्रामध्ये सध्या लागू करण्यात आलेले निर्बंध कायम राहतील त्यामध्ये बकरी ईद निमित्त कोणतीही शिथिलता देता येणार नाही. या आदेशाच्या आधिन राहून शासनाच्या आदेशाचे पालन करूनच बकरी ईद सण साजरा करण्यात येईल अशी हमी देत भाजपचे रायगड जिल्हा युवा प्रवक्ता जमीर बशिर शेख यांनी प्रतिकात्मक कुर्बानी देण्याची परवानगी देण्याची मागणी पोलिस ठाण्यात दिलेल्या निवेदनात केली आहे.






Be First to Comment