चला जंजिरा किल्ला फिरायला : ऐतिहासिक जंजिरा पर्यटकांसाठी खुला
जंजिरा जल वाहतुक संस्थेतील 250 कुटुंबांना दिलासा
सिटी बेल | मुरूड जंजिरा | अमूलकुमार जैन |
मुरुड या पर्यटनस्थळी ऐतिहासिक जंजिरा किल्ला हे पर्यटकांसह इतिहास प्रेमी अभ्यासकांचे सर्वात अधिक पसंतीचे ठिकाण आहे .कोविड च्या पार्श्वभूमीवर प्रार्दुभाव वाढु नये म्हणून दि .14 एप्रिल 2021 रोजी बंद असलेला जंजिरा किल्ला जिल्हाधिकारी व भारतीय पुरातत्व विभागाने पर्यटकांसाठी दि. . 9 ऑक्टोबर 2021 रोजी वाहतुकी साठी खुला केल्याने पर्यटकां सह स्थानिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे .
मुरुड ला पर्यटकांची संख्या लॉक डाऊन मुळे अत्यंत रोडावली होती . मात्र लसीकरण वाढल्यामुळे तसेच कोविड ची सर्वतोपरी खबदारी घेत पर्यटकांची संख्या वाढु लागली असुन व्यावसायिकांच्या टृष्टीने हा शुभ शकुन आहे .
उदरनिर्वाहाचा एकमेव पर्यायाला दिलासा :
जंजिरा किल्ल्यावर आलेल्या पर्यटकांची किल्लावर सुखरूप ने – आण करणे , त्यांना किल्ल्याची माहिती सांगणे हा राजपुरी येथील होडी व्यावसायिकांचा सुमारे 150 कुटुम्बाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न जंजिरा खुला केल्यामुळे अशंतः मार्गी लागुन दिलासा मिळाल्याचे जंजिरा जल वाहतुक संस्थेचे व्यवस्थापक नाझिम कादिरी यांनी सांगितले .
या वर्षी पावसाचे प्रमाण सर्वाधिक असल्याने किल्यात झाडे झुडपे , गवताचे रान वाढले आहे . किल्ल्याच्या साफसफाई कामात बोट मालकांचे सहकार्य मिळत आहे . रोजंदारी वर माणसे लावुन साफ सफाईचे काम सुरु आहे . कोविड चे सर्व नियमांना अधिन राहून वाहतुकी साठी सकाळी 9 ते संध्या .5 वाजे पर्यंत बोट धारकांना परवानगी असल्याची माहिती पुरातत्व विभागाचे सहाय्यक संवर्धक बी .जी .येलीकर यांनी दिली .
एकूणच जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी खुला केल्या मुळे स्थानिक पर्यटन पूरक व्यवसाय करणाऱ्यां मध्ये उमेदीचे वातावरण दिसत असुन पर्यटकांचा ओघ पूर्ववत होईल असा विश्वास व्यक्त होत आहे .










Be First to Comment