मांजगाव पंचायत येथे शंभर टक्के लसीकरण करण्याचा संकल्प
सिटी बेल | काशिनाथ जाधव |
पाताळगंगा |
मागील दीड वर्षाच्या कालावधी पासून कोरोना या महामरीच्या आजराने साऱ्यांनीच झोप उडविले असून या आजारावर लसीकरणाची मोहीम सुरक्षा कवच म्हणून शासनाने आणली असून प्रत्येकाने १८ वर्षाच्या पुढील नागरिकांना दोन वेळा दिलेल्या ठराविक वेळेत घेऊ न सहकार्य करण्याचे अहवान केले.असून त्यासाठी गावोगाव ही मोहीम राबवून लसीकरण सुरू आहे या लसीकरणाच्या अनुषंगाने शासनाचे सुरक्षा कवच म्हणून ही योजना राबवीत असताना मांजगाव येथे प्राथमिक शाळेत लसीकरणाची मोहीम सुरू केल्याने या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळत आहे
यावेळी या लसीकरणाच्या उदघाटनासाठी जिल्हा परिषद सदस्या पदमा सुरेश पाटील खालापुरचे उपसभापती विश्वनाथ पाटील माजी उपसरपंच जया जनार्धन जाधव, कमळ जाधव, शारदा पंढरीनाथ जाधव सरपंच गोपीनाथ जाधव ग्रूप ग्राम पंचायत सदस्य रमेश जाधव, नितीन महाब्दि रजनी अविनाश कांबळे,कल्पना वाघे,सुवर्णा भरत पाटील रमेश ढवाळकर अविनाश कांबळे , जयवंत पाटील,विलास कांबळे, नामदेव वाघे, ग्रामसेवक संदीप धारणे, मुख्याध्यापिका अंजली विचारे अंगणवाडी सेविका मदतनीस आदी उपस्थित होत्या. यावेळी ३०० डोस लसीकरण झाले अशी माहिती ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक संदीप धारणे यांनी दिली आहे.
Be First to Comment